शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार व पीडब्ल्यूडीने आणले जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही मनमानी चालविल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. कमरेएव्हढे खड्डे आणि गुढघ्याभर चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. खड्डे भरणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या भागातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काँक्रीटीकरण केला जात आहे. एका बाजुचे काँक्रीटीकरण काम सुरू असल्यामुळे दुस:या भागाचा रस्ता रहदारीसाठी मोकळा आहे. परंतु याच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अक्षरश: जिवघेणी कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. चिखलाचाही थर साचला आहे. गुढघ्याभर चिखलातून वाहनचालक वाट काढत नाही तोच पुन्हा कमरेएवढय़ा खड्डय़ातून वाहन काढावे लागते. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. खड्डे बुजविणे आणि गाळ जेसेबीने काढणे आवश्यक असतांना ठेकेदाराने अक्षरश: मनमानी कारभार चालविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील या ठेकेदारावर कुठलेही नियंत्रण नाही. ठेकेदार व पीडब्ल्यूडी विभाग यांनी संगनमत करूनच नागरिकांच्या व वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू ठेवला आहे. या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून भोणे फाटा, विश्वकर्मा मंदीर आणि तेथून व्ही.जी. पेट्रलपंप र्पयत पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. परंतु वाहतूक वळविण्याआधी भोणे फाटा ते विश्वकर्मा मंदीर र्पयतच्या रस्त्याची डागडुजी आणि आजूबाजू भराव करणे आवश्यक असतांना तसे न करता थेट वाहतूक वळवून दिली. त्यामुळे या रस्त्यावरून दोन वाहने जाणेही जिकरीचे ठरते. पर्यायी रस्ता तातडीने सुधारणा केली नाही आणि काम सुरू असलेल्या अध्र्या रस्त्याचे खड्डे भरले नाही आणि गाळ काढला नाही तर या भागातील नागरिक, व्यावसायिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मुळात पावसाळ्यात काम सुरू करणेच चुकीचे होते. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याचा हा अजब कारभार सध्या शहरवासी अनुभवत आहेत. नवापूर-विसरवाडी महामार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक नंदुरबारमार्गे वळविली आहे. वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जिवघेणे कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे आश्यक आहे.