शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मतदान यंत्रणांची राजकीय प्रतिनिधींसममोर सरमिसळ प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणल्या जाणा:या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणल्या जाणा:या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संगणकाद्वारे करण्यात आली.यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी धर्मेद्र जैन तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी आलेले बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ प्रक्रीया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपुर्ण ऑनलाईन प्रक्रीया करण्यात आल्याने यात मानवी हस्तक्षेपास वाव राहणार नसून मतदान यंत्र कोणत्या विधानसभा मतदार संघात जाणार आहे याची माहिती कुणालाही राहणार नाही. विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यंत्रांची सरमिसळ करुन त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची दोनस्तरावर सरमिसळ होणार आहे, असे यावेळी भारुड यांनी सांगितले. निकम म्हणाले, जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी दोन हजार 446 बॅलेट युनिट, 1 हजार 708 कंट्रोल युनीट आणि 1 हजार 773 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व यंत्रांची बंगलोरच्या बीईएल कंपनीच्या अभियंत्यांनी तपासणी केली आहे. यंत्रांची सरमिसळ करुन जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाच्या स्ट्रॉग रुममध्ये पुन्हा सिल बंद करुन ठेवण्यात येतील.  जिल्ह्यात एकूण 1 हजार 385 मतदान केंद्र असून प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान यंत्रे देण्यात येणार असून शिल्लक यंत्रे चारही मतदार संघासाठी राखीव म्हणून ठेवण्यात येतील.