शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

बोकळझर ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

नवापूर : तालुक्यातील बोकळझर येथील ग्रामपंचायतीअंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...

नवापूर : तालुक्यातील बोकळझर येथील ग्रामपंचायतीअंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये बोकळझर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा, ग्रामसभा घेतल्या नाहीत. सदस्यांची उपस्थिती पत्रक व इतिवृत्तदेखील ठेवले नाही.

१४ व्या व १५व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीचे गाव आराखड्यानुसार विकासकामे न करता प्राप्त निधी खर्च केल्याचे, तसेच हिशेबाचे कोणतेही अभिलेख ठेवलेले नाहीत. तसेच ग्रामविकास प्राप्त निधी खर्च न करता रक्कम खर्ची टाकण्यात आली आहे.

दुहेरी हातपंपाची कोणतेही काम न करता निधी खर्च केल्याचे दाखविले आहे.

ग्रामपंचायतीला पेसा कायद्यांतर्गत, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत, घरपट्टी, नळपट्टी, आदींबाबत मिळालेला निधी विकासकामांसाठी खर्च न करता खर्ची टाकलेला आहे.

स्मार्ट व्हिलेज पुरस्काराची मिळालेली रक्कमदेखील खर्च न करता खर्ची दाखविण्यात आली.

या ग्रामपंचायतीचे सर्व बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराची सविस्तर तपासणी करण्यात यावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.