शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक केंद्रात सुविधेची हमी परंतू काच पेटय़ांची होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक संगोपन केंद्रात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याची घटना घडली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक संगोपन केंद्रात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याची घटना घडली होती़ सर्वसोयी सुविधांयुक्त असलेल्या या केंद्रात काचेच्या पेटय़ांची कमी असल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता नियुक्त केलेल्या चौकशी समितीने वर्तवली आह़े  दुर्गम भागातील गर्भवती माता व बालकांना उपचार मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कक्षांची निर्मिती करण्यात आली आह़े यात नवजात अर्भक उपचार केंद्राचा समावेश करण्यात आला आह़े या केंद्रात कमी दिवस व कमी वजनाच्या अर्भकांना काचेच्या पेटीत निश्चित तापमानात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात़ जिल्हा रुग्णालयातील चांगल्या दर्जाच्या या सुविधेमुळे महिन्याकाठी 400 माता प्रसूतीसाठी दाखल होतात़ यातील किमान 40  मातांच्या नवजात अर्भकांना कमी वजन किंवा इतर कारणास्तव केंद्रात दाखल करण्यात येत़े सोबतच जिल्ह्यातील दोन उपजिल्हा आणि 11 ग्रामीण रुग्णालयात प्रसूत झालेल्या मातांच्या बालकांनाही याठिकाणी उपचारासाठी आणले जात आह़े यामुळे या कक्षात बालकांना ठेवण्यासही जागा शिल्लक राहत नसल्याचे सांगण्यात आले आह़े परिणामी एका पेटीत दोन किंवा तीन अर्भकांवर चार दिवसांर्पयत उपचार करण्याची वेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर  येऊन ठेपली आह़े एकापेटीत अधिक बालक असल्यानेच त्यातील एक बालक खाली पडल्याचा प्रकार घडल्याने नवजात अर्भक केंद्रातील समस्या ऐरणीवर आल्या आहेत़ या समस्येवर मात करण्यासाठी नंदुरबार येथील महिला रुग्णालय आणि अक्कलकुवा येथील नवजात अर्भकांसाठीचे केंद्र तातडीने सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आह़े 

जिल्हा रुग्णालयातील अर्भक केंद्रासाठी शासनाने 24 पेटय़ांची मंजूरी दिली आह़े एकापेटीत साधारणपणे एक बालक ठेऊन त्याच्यावर युव्ही लाईटद्वारे उपचार देत शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो़ परंतू येथे दरदिवशी साधारण 45 अर्भकांना दाखल करण्यात येत़े 1 दिवस ते 1 महिन्याचे वय असलेल्या बालकांचे वजन हे अडीच किलो आत असणे किंवा एखाद्या किरकोळ आजारामुळे प्रकृतीवर परिणाम झाल्यानंतर बाळांना याठिकाणी आणले जात़े 24 पेटय़ांच्या स्वतंत्र कक्षासह चार पेटय़ांचे माता व अर्भकांसाठीचे आणखी एक कक्षही येथे आह़े याठिकाणीही किमान 15 च्या जवळपास बालक आणि मातांना ठेवण्यात येत़े दोन्ही कक्ष मिळून 60 अर्भकांसाठी 60 पेटय़ांची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता़ परंतू त्यांच्याकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने जन्मास आल्यापासूनच अर्भकांना दाटीवाटीने उपचार घ्यावे लागत असल्याचा प्रकार घडत आह़े