शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

तळोद्यात टरबूजावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:13 IST

तळोदा परिसर : शेतकऱ्यांचे होतेय आर्थिक नुकसान, उपाय योजना व्हावी

्नरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात टरबूज या वेलवर्गीय पिकावर करपा व डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ पिकांची वाढ खुंटली असल्याने साहजिकच शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ कृषी विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली असून विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांकडून बुरशीनाशकांची फवारणी केली जात आहे़परिसरात कुपनलिकांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांकडून ठिबकवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे़ टरबूज पिकाला जेमतेम पाणी देणे सुरु आहे़ सध्या परिसरात चांगलेच तापत असल्याने या वेलवर्गीय पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़करपा रोगात पानांवरील लव अधिक असल्याने वेल जमिनीवर पसरत जात आहेत़ दमट हवामानामुळे वेलांची पाने गळत आहेत़ तर डावणीच्या प्रादुर्भावात वेल पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे़ शेंड्याची पाने बारीक होत असून फळधारणाही कमजोर होत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ बहुतेक शेतकºयांकडून बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आहे़दरम्यान, शेतकºयांकडून टरबूज लागवडीसाठी महागडे बियाणे, ठिबक, माल्चिंग पेपरसह मजुरी यावर आधीच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे़ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टरबूजाची वाढ खुंटली आहे़ तसेच त्याच्या दर्जाही खालावला असल्याचे टरबूज उत्पादक शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच बाजारात अशा टरबूजाला मागणीही नसल्याने याचा सरळ परिणाम शेतकºयांच्या उत्पन्नावर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हवामानातही फारमोठे वेगवान बदल झालेले दिसून आले़ आता सध्या परिसरात तीव्र उन्ह पडत असल्याने साहकिच पिकांना पाण्याची मागणी वाढली आहे़ त्यातच दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे़ त्यामुळे टरबूज पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी देणे शक्य होत नाही़ त्यामुळे करपासारखे संधीसाधू आजारांचा पिकांवर प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी भारतसिंग गिरासे यांनी सांगितले की, माल्चिंग पेपरच्या सहाय्याने ठिबक सिंचनावर टरबूज पिकाची लागवड केली होती़ तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी व ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर केल्याने हे वेलवर्गीय पिक चांगले बहरले होते़ परंतु दमट हवामानामुळे व पाणीटंचाईमुळे पिकांवर करपा सारखे रोग होत आहेत़ त्याच प्रमाणे विविध रोगांमुळे पिकांचा दर्जा खालावत असून बाजारात अशा फळाला मागणी नसल्याने समस्या निर्माण होते़