शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

नाशिक आयुक्त कार्यालयातून चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्या ची व्हिलेवाट कशी लावली ती माहिती जाणून घेतली. त्यावर ...

नाशिक आयुक्त कार्यालयातून चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्या ची व्हिलेवाट कशी लावली ती माहिती जाणून घेतली. त्यावर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. नवापूर परिसरातील इतर कुक्कुटपालन केंद्रांची पाहणी व चौकशी सुरू असून नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज नवापूर परिसरातील पोल्ट्री फार्मवर नाशिक प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बाबुराव नरवाडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. शहाजी देशमुख, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. जी. आर. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाडवी, डॉ. अमित पाटील, डॉ. योगेश गावीत, डॉ. के डी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यू. डी. पाटील, पशुसंवर्धन अधिकारी नंदुरबार यांनी भेटी देऊन तपासणी केली.

सील लावलेले फार्म

नवापूर तालुक्यातील एकूण २५ पोल्ट्री फार्मपैकी चार पोल्ट्री सील करण्यात आहे. डायमंड पोल्ट्री फार्म, वसीम पोल्ट्री फार्म, आमलिवाला पोल्ट्री फार्म, परवेज पठाण पोल्ट्री फार्म यांचे फार्म बुधवारी रात्री उशिरापर्यंत सील करण्यात आले. यापैकी डायमंड पोल्ट्री फार्म विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पोल्ट्री सील

नवापूर तालुक्यातील २५ पोल्ट्री फार्मपैकी चार पोल्ट्री फार्ममधून ११ पक्ष्यांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सदर चारही पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांची ने-आण वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. नवापूर तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यावसायिकांची जिल्हा प्रशासन पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करीत आहे. प्रांताधिकारी यांनी पोल्ट्री व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या योग्य ते मार्गदर्शन केले. अशी माहिती पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी दिली

दोन दिवसात चार हजार कोंबड्याचा मृत्यू

बधुवारी १ हजार २८९ कोंबड्यांचा मृत्यू झाला तर गुरुवारी २ हजार ६५५ गेल्या पंधरा दिवसांमध्ये नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फॉर्म मध्ये २० ते २२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण सदर ठोस पुरावे आम्हाला आढळून आले नाही, असे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची कमतरता

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची जैव सुरक्षा संदर्भात अधिकाऱ्यांना गुरूवारी प्रशिक्षण देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांची डोकेदुखी नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लू अलर्टचा उपाययोजनांबाबत दिसून येत आहे. अधिकाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे.या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाय योजना करण्या गरजेच्या आहेत.

बर्ड फ्लू रिपोर्ट पद्धत

नवापूर तालुक्यातील ११ मरतूक कोंबड्यांचा अहवाल पुणे येथे पाठवण्यात आला आहे त्यानंतर भोपाल येथे अहवाल पाठवण्यात येईल अहवाल निष्पन्न झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला कळवेल यानंतर जिल्हा प्रशासन बर्ड फ्लूची लागण झाली की नाही याची घोषणा करेल.

पक्षी मेलेल्या अवस्थेत आढळल्यास संपर्क करावा

नवापुर तालुक्यातील कोंबड्यांचं अचानक मेलेल्या अवस्थेत आढळले किंवा पक्षी आढळून आले तर त्या पक्ष्यांना हात न लावता तत्काळ पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क करावा. डॉ अशोक वळवी पशुधन विकास अधिकारी पं.स. नवापूर मो क्र- ८२०८२८२९८८, डॉ योगेश गावीत- ९०११३६११६५, डॉ. अमित पाटील-८९९९३४०४०८ यांच्याशी संपर्क करावा.