शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते ...

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते तळोदा चौफुली मार्गे बसस्थानकापर्यंतच्या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या वेळी दोन्ही ठेकेदारांनी एकाच वेळेला काम सुरू केल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. शिवाय पर्यायी रस्त्याची व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गुुरुवारी ॲम्बुलन्सदेखील अर्धा तास यात अडकून पडली होती.

याबाबत असे की, प्रकाशा येथील तापी पुलापासून ते तळोदा चौफुली पर्यंतच्या मार्गावर कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने उशिरा का होईना काम सुरू केले. परंतु या ठिकाणी वाहनधारकांना तळोदा व शहादाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय नाही, शिवाय दररोज मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, सूचना फलकाच्या अभावामुळे रोज एक अपघात होत आहे. रस्त्यांच्या कामामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत असून, पर्यायी रस्त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

तसेच तापी नदी पूल ते केदारेश्वरकडील मार्गाचे देखील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रकाशा ते म्हसावदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू असून, त्या अंतर्गत येथील डांबरीकरण सुरू झाले आहे. खास करून प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वरपर्यंतच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूकदारांची कोंडी होत आहे.

नंदुबारकडून प्रकाशाकडे येणारे सर्वच वाहनधारकांची गैरसोय होत असून, गुरुवारी सायंकाळी चार वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती. शिवाय या ठिकाणी वाहनधारकांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नाही. ज्या ठेकेदारांना काम घेतले आहे. त्याचे ही माणसं या ठिकाणी नसल्याने वाहनांना दिशा दाखवणारा कोणी नसल्याने वाहने कुठेही घुसत असल्याने ट्रॅफिक जाम झाली होती. सायंकाळी येथून ॲम्बुलन्सलादेखील अर्धा तास मार्ग नव्हता, अशी वेळ दुसऱ्यांदा येऊ नये. यासाठी संबंधित ठेकेदाराने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पर्यायी रस्ता काढणे अत्यावश्यक आहे. वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी त्यांचे स्वतःचे मनुष्य त्याठिकाणी उभी करणे गरजेचे आहे.

दोन रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू झाल्याने वाहनधारकाना अडचणी आहे. निदान दोघं ठेकेदाराने एकेरी मार्ग तरी सुस्थितीत सुरू ठेवावा जेणेकरून ट्रॅफिक नियमित जाम होणार नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.

उडणारी धूळ त्रासदायक

तापी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतच्या मार्गावर गेल्या १५ ते २० दिवसांपासून काम सुरू झाले आहे. या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम झाल्यामुळे माती उडत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर उडणारी धूळ दुचाकीधारकांच्या डोळ्यात जात अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे.