शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आजार होऊच नये यासाठी त्रिसूत्री अमलात आणा-कोरोनाशी लढताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

आपल्याला या दोन्ही मानसिकतेमधील सुवर्णमध्य शोधावा लागेल. आजारी पडल्यानंतर घाबरण्यापेक्षा, आजारी होण्याआधी सकारात्मक घाबरणे केव्हाही चांगले. कोरोना म्हणजे ...

आपल्याला या दोन्ही मानसिकतेमधील सुवर्णमध्य शोधावा लागेल. आजारी पडल्यानंतर घाबरण्यापेक्षा, आजारी होण्याआधी सकारात्मक घाबरणे केव्हाही चांगले. कोरोना म्हणजे एक षडयंत्र आहे असे मानून गांभीर्य लक्षात न घेऊन, सरकारी यंत्रणेचे निकष न पाळण्यात मोठेपणा मानणारा एक वर्ग, तर दुसरीकडे ॲपेंडिक्स फुटून पू होईपर्यंत बाहेर कोरोना आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये न येणारा दुसरा वर्ग.

या दोन्ही मानसिकता अतिरेकी आहेत. याचा सुवर्णमध्य म्हणजे आजार होणार नाही त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व हाताची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अंमल करणे व आजार झालाच तर न घाबरता, योग्य पद्धतीने त्याचा सामना करणे.

कोविडसदृश लक्षणे आल्यास आपल्याजवळील डाॅक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्वप्रथम तपासणी करणे. आपले वय, लक्षणे, इतर आजार, ऑक्सिजन सॅच्युरेशन व गरज पडल्यास प्राथमिक रक्त तपासणी या गोष्टींचा विचार करून प्राथमिक उपचार सुरू केले जातात. त्वरित स्वॅब किंवा सीटी स्कॅन करून, बऱ्याच वेळा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. या काळात रुग्णाने घरातसुद्धा मास्क घालणे योग्य आहे व स्वतःला क्वारंटाईन केल्यास इतरांना आजार पसरू शकणार नाही.

दोन-तीन दिवसात जर लक्षणे वाढली तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वॅब तपासणी केली जाते. तेव्हाही सीटी स्कॅनची गरज नसते. जास्त वय, इतर आजार व ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असल्यास योग्य वेळी, सी.टी. स्कॅन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.

या सर्वांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा ‘संजीवनी बुटी’सारखा शोध घेऊ नये. हॉस्पिटलमध्ये रुग्ण असल्यास, हॉस्पिटल रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी यंत्रणेमार्फत उपलब्ध करू शकतात.

विलगीकरण काळात एकटे असताना, मानसिक दडपण न घेता, आपल्या आवडी (वाचन, लिखाण, संगीत) पूर्ण कराव्या. आपल्या कुटुंबीयांना धीर द्यावा. नातेवाईकांनी सर्व काळजी घेऊन होईल ती मदत व मानसिक आधार द्यावा. नियमित व्यायाम, प्राणायाम करावा. कोरोना नंतर, फुफ्फुसाची क्षमता कमी होते. त्यासाठी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे.

वैयक्तिक बजेटमध्ये, इतर खर्च (गाडी, परदेशवारी, मोठे लग्न) कमी करून, मेडिक्लेम व आकस्मिक उपचारासाठी सोय करावी. सरकारनेसुध्दा तुटपुंजे हेल्थ बजेट वाढवावे.

मित्रांनो, वेळ कधी थांबत नाही. हे जागतिक संकटसुद्धा नक्कीच जाणार.