शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित बोकरू रामसिंग कोकणी याच्याविरोधात वन गुन्हा दाखल आहे.           कोकणीपाडा गावात लाकडाचा कारखाना सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार गुरुवारी धुळे येथील दक्ष्ता विभागाचे विभागीय वन अधिकारी, नंदुरबार येथील सहायक वनसंरक्षक, शहादा, नवापूर, चिंचपाडा, धडगाव, बिलगाव, तोरणमाळ, काकर्दा येथील वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी वनतस्कर बोकरू रामसिंग कोकणी याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असता त्या ठिकाणी अवैधरित्या चालवण्यात येणारे रंधा मशीन आणि सागाचे लाकूड असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा जप्त केलेले लाकूड शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. या गुन्ह्याबाबत चिचंपाडा वनरक्षक यांनी गुन्हा दाखल केला आहे. पथकाने या ठिकाणाहून २२० नग साग लाकूड, एक रंधा मशीन इलेक्ट्रिक मोटारसह तीन डिझाईन मशीन, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात असे अनेक अवैध लाकूड कटिंगचे कारखाने सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.