शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

योग्य भाव न दिल्यास पपई तोड बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात पपईची तोड सुरू आहे मात्र सुरूवातीच्या आणि सध्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात पपईची तोड सुरू आहे मात्र सुरूवातीच्या आणि सध्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये एकमत नाही. स्थानिक व्यापारी प्रती किलो ११ रूपये भाव देण्यास तयार असताना परराज्यातील व्यापारी मात्र नकारात्मक भूमिका घेत आहे. व्यापाºयांमध्ये समन्वय न झाल्यास शेतकºयांना पपई तोडबंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे पपई उत्पादक शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.तालुक्यात पपई काढणीला सुरूवात झाली असून व्यापाºयांकडून योग्य भाव देण्याबाबत एकमत नसल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ऐन हंगामाच्या सुरूवातीला पपईला १७ रुपये प्रतीकिलो भाव देण्यात येत होता. मात्र महिन्याभराच्या आतच व्यापाºयांकडून सात रुपये भाव देण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पपईला ११ रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षापासून परराज्यातील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी शहादा तालुक्यात येतात. तालुक्यात दोन-चार नव्हे तर आता ८० ते ९० व्यापारी गटागटाने येतात. व्यापाºयांची संख्या मोठी असल्याने मनाला पटेल त्या भावाने ते पपई खरेदी करतात. याआधीही तालुक्यात पपईच्या दरावरुन आंदोलने झाली आहेत.यंदा अतिवृष्टीमुळे पपईचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे व्यापाºयांकडून सुरुवातीला प्रतीकिलो १७ रुपये भाव देण्यात आला. तालुक्यात एका दिवसाला ५० ते ५५ ट्रक पपई व्यापाºयांकडून खरेदी करून दिल्ली व उत्तर प्रदेशात निर्यात होते. सद्यस्थितीत पपईला प्रतीकिलो फक्त सात रूपये भाव देण्यात येत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत पपईची तोड करण्यास नकार दिला आहे. स्थानिक व्यापारी ११ रुपये भाव देत असताना बाहेरील व्यापाºयांनी सात रुपयांपेक्षा जास्त भाव मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. व्यापाºयांच्या दराबाबत सुरू असलेल्या चढाओढीमुळे शेतकºयांपुढे पेच निर्माण झाला आहे. स्थानिक व बाहेरील व्यापाºयांनी पपईच्या दराबाबत शेतकºयांना परवडेल असा योग्य निर्णय घेऊन शेतकरी व व्यापाºयांमधील संभाव्य संघर्ष टाळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पपई उत्पादक शेतकºयांनी योग्य भाव न मिळाल्यास पपईची तोड बंद करण्याची भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनानेही याकडे लक्ष घालून पपईच्या दराबाबत योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.४शेतमालाला योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा शेतकºयांची असते. मात्र व्यापारी त्यांच्या सोयीनुसार भाव ठरवत असल्याने शेतकरी योग्य भाव मिळण्यापासून वंचित राहतो. त्यातच मजुरी, चहा-पाणी, नाश्ता आदी खर्च व इतर किरकोळ खर्च हा शेतकºयांकडून वसूल होतो. व्यापाºयांकडून देण्यात येणाºया दराच्या चढ-उतारामुळे शेतकºयांना बºयाचवेळेस नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच काही व्यापाºयांना आधी माल दिल्यामुळे अनेक व्यापारी पैसे नंतर देऊ, असे आश्वासन देऊन रफूचक्कर होत असल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. व्यापारी पसार होऊन शेतकºयांचे पैसे बुडाल्याच्या घटना तालुक्यात बºयाचवेळा घडल्या आहेत.