शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वॉरंटाईन पोलिसाची ग्राम सुरक्षा दलाशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 13:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : होम क्वॉरंटाईन असलेला पोलीस कर्मचारी विना मास्क बाहेर खरेदीसाठी निघाले असतांना त्यांना ग्राम सुरक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : होम क्वॉरंटाईन असलेला पोलीस कर्मचारी विना मास्क बाहेर खरेदीसाठी निघाले असतांना त्यांना ग्राम सुरक्षा दलांनी हटकले असता त्यांच्याशी वाद घालून रस्त्यावर लावण्यात आलेले लाकूड व टायर फेकून दिल्याची घटना दुधाळे शिवारात घडली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा २४ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.योगेश दगडू लोंढे, रा.दुधाळे शिवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दगडू लोंढे यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी घरातच राहणे आवश्यक असतांना १९ रोजी सायंकाळी सहा वाजता ते खरेदीसाठी घराबाहेर निघाले. निघतांना तोंडाला मास्क देखील लावला नाही. दुधाळे शिवारातील कोकणी हिल कमाणीजवळ त्यांना तेथील ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी अडविले असता त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. अडथळा फेकून दिला. सरपंच सत्यप्रकाश माळसे हे तेथे आले असता त्यांच्याशी वाद घालून सरपंचांना हा अधिकार आहे का? अशी विचारणा केली. सरपंच सत्यप्रकाश माळसे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून २४ रोजी सायंकाळी उशीरा फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात योगेश लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.