शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बंदच ! गोदाम म्हणून होतोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील चार आगारांपैकी केवळ नंदुरबार आगारातील हिरकणी कक्ष बंदच आहेत. नंदुरबार आगाराने देखील गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील चार आगारांपैकी केवळ नंदुरबार आगारातील हिरकणी कक्ष बंदच आहेत. नंदुरबार आगाराने देखील गेल्या काही दिवसांपासून या कक्षाची धूळ झटकली आहे. दरम्यान, हिरकणी कक्षाबाबत अनेक महिलांना माहितीच नसल्याची बाब देखील समोर आली आहे. बसस्थानकात स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष अर्थात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सुरुवातीला मोठा गाजावाजा करून हा कक्ष सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला काही प्रमाणात त्या ठिकाणी स्तनदा मातांसाठी सोयीही बऱ्यापैकी करण्यात आल्या होत्या. नंतर मात्र या कक्षाकडे दुर्लक्ष झाले. जिल्ह्यातील चारही आगाराच्या स्थानकांवर ही स्थिती झाली. नियमित स्वच्छता न करणे, आवश्यक त्या सुविधा न देणे, पंखा किंवा विजेच्या दिव्याची सोय न करणे यासह इतर बाबी वारंवार घडू लागल्या. त्यामुळे महिलांनीही त्याकडे पाठ फिरवली. सोमवारी दुपारी नंदुरबार बसस्थानकातील हिरकणी कक्षाची पहाणी केली असता ते उघडे होते. परंतु त्या ठिकाणी कुणीही नव्हते. केवळ एक व्हिलचेअर ठेवण्यात आलेली होती. शहादा, नवापूर व अक्कलकुवा स्थानकातील हिरकणी कक्ष तर बंदच होते. केवळ त्या ठिकाणी फलक लावलेला होता. अनेक महिलांना अशा प्रकारचा कक्ष असतो याची माहितीच नसल्याची बाब देखील काही महिलांशी चर्चा केली असता यावेळी समोर आली. 

महिलांना माहितीच नाही... नंदुरबार व शहादा येथील बसस्थानकातील अनेक महिलांना हिरकणी कक्षाबाबत विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगण्यात आले. हा कक्ष कशासाठी असतो याचीही माहिती या महिला प्रवाशांना नव्हती. शहादा येथील काही महिलांनी मात्र बाळाला दूध पाजण्यासाठी या कक्षात बसता येते अशी माहिती दिली. परंतु ते कधी सुरू असते याची माहिती त्यांना नव्हती. 

नेहमीच बंदच असतो कक्ष...शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगारातील हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. नंदुरबार आगारातील कक्ष देखील बंद राहत होता. परंतु गेल्या महिनाभरापासून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. परंतु नियमित स्वच्छता राहत नसल्यामुळे महिला त्या ठिकाणी जात नसल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार स्थानकातील कक्ष सुरू केला कोरोना काळात हिरकणी कक्ष बंद होता. परंतु आता आगार व स्थानक नियमित सुरू झाल्याने कक्षही नियमित सुरू असतो. वेळोवेळी स्वच्छता केली जाते. महिलांमध्ये कक्षाबाबत जागृती झाली तर प्रतिसाद वाढेल.                                                                                        -मनोज पवार,नंदुरबार बसस्थानक प्रमुख.