शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन झाल्यास भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे उत्पादन कमी होत असल्याचेही छत्तीसगढचे मिरची तज्ज्ञ नवीन पेडीयार यांनी सांगितले. डॉ.हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र कोळदा येथे मिरची पिकावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात छत्तीसगढ मधील प्रख्यात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख मिरची उत्पादकांची उपस्थिती लाभली. मागील हंगामात लाल व हिरव्या मिरचीला मिळालेला दर व सध्याच्या हंगामात लांबलेल्या पावसामुळे ब:याच शेतक:यांचा कल मिरची पिकाकडे दिसू लागला आहे. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषक मंडळात मिरची पिकावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले होते.असंतुलित ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यामुळे मिरचीच्या मुळांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात क्षार वाढत असतात व याचा फटका मिरची पिकाच्या कायिक वाढीवर आणि  उत्पादनावर होत असल्याचे प्रतिपादन नवीन यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी मिरची पिकाची जिल्ह्यातील सद्य:स्थिती शेतक:यांसमोर मांडली. मिरची उत्पादकांना आपल्या अडचणींच्या निरसनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला मिरची उत्पादकाच्या शेतात एकत्रित येण्याचे पाटील यांनी सूचित केले. दरम्यान, जिल्ह्यातील मिरची उत्पादकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, जिल्ह्यातील समस्त मिरची उत्पादकांनी यासाठी आपले नंबर देण्याचे, ही आवाहन करण्यात आले.कृष्णदास पाटील यांनी शेतक:यांना कृषी विज्ञान केंद्राच्या सानिध्यात राहून केंद्राद्वारे वेळोवेळी विविध पिकांवर होत असलेले मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात लाल व हिरव्या मिरचीचे शहादा तालुक्यात 39 टन प्रति एकर विक्रमी उत्पादन घेणारे औरंगपूर येथील विक्की पटेल तसेच नंदुरबार तालुक्यात 45 टन प्रति एकर विक्री उत्पादन घेणारे सावळदा येथील रामेश्वर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रगतीशिल शेतकरी योगेश पटेल, आशिष पटेल, प्रविण पाटील यांनीही अनुभव मांडले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पी.सी. कुंदे यांनी केले. जयंत उत्तरवार, उमेश पाटील, आरती देशमुख, राजेश भावसार, विजय बागल, डॉ.महेश गणापुरे, गीता कदम, राहुल नवले, कल्याण पाटील, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कैलास सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

या प्रशिक्षणात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी शेतक:यांना मिरचीच्या रोप निर्मितीपासून तर मिरची पिकातील फटीर्गेशन, रोग, कीड नियंत्रणावर विस्तृत मार्गदर्शन केले. मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे असून, यासाठी फटीर्गेशन रोपांच्या लागवडीनंतर आठवडय़ाभरात प्रारंभ करणे महत्वाचे आहे.