शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयनगरसह परिसरात पावसाचे जोरदार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

सोमवारी पहाटे जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे कापूस, मका, मूग, बाजरी, ज्वारी, मिरची यासारख्या पिकांना ...

सोमवारी पहाटे जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे कापूस, मका, मूग, बाजरी, ज्वारी, मिरची यासारख्या पिकांना जीवदान मिळाले आहे; तर केळी, पपई, ऊस यासारख्या पिकांची वाढ जोमाने होण्यास या पावसामुळे मदत होणार आहे. शनिवारी संध्याकाळी जयनगरसह कहाटूळ, लोंढरे, कोंढावळ या भागांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडला होता. हा पाऊस १५ दिवसांनंतर आल्यामुळे पिकांना थोडेफार जीवदान मिळाले होते. दुसर्‍यादिवशी अनेक शेतकऱ्यांनी या पावसावरच कापूस, मिरची, पपई, केळी यासारख्या पिकांना रासायनिक खते दिली होती. आता पावसाची सुरुवात झाली, या आशेने शेतकऱ्यांनी रासायनिक खते टाकली होती. रविवारी दिवसभर केवळ चटका देणारे उन्हाशिवाय वातावरणात पाऊस येईल, याचा काही अंदाज नव्हता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते पिकांना टाकली होती, ते शेतकरीही चिंताग्रस्त झाले होते. एक तर पाऊस येत नव्हता. त्यामुळे बहुतांश शेतकरी दुबार व तिबार पेरणीच्या धाकामुळे चिंतातूर होत होते. मात्र शनिवारी हलका पाऊस पडल्यामुळे दुसऱ्यादिवशी ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते टाकले, ते पाऊस येईल का नाही? या चिंतेत होते. मात्र सोमवारी पहाटे जयनगरसह परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे शेतकरी दुबार व तिबार लागवड व पेरणीपासून मुक्त झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते लावली होती, त्यांचाही यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या पावसामुळे सगळ्याच पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. शिवाय पावसाच्या जोरदार आगमनामुळे अनेक ठिकाणी नाले भरल्यामुळे जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. जुलै महिन्यात दोन आठवडे उलटल्यावर हा पहिलाच जोरदार पाऊस झाल्यामुळे जयनगरसह परिसरातील शेतकरी सुखावला असून, त्यामुळे आपण लावलेल्या पिकांमधून चांगले उत्पन्न येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.