शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा गणेशमूर्ती कारखान्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीचा फटका गणेशमूर्ती कारखान्यांनाही बसला आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 टक्के मूर्त्ीचेही बुकींग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टीचा फटका गणेशमूर्ती कारखान्यांनाही बसला आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 टक्के मूर्त्ीचेही बुकींग झाले नसल्याची खंत मूर्ती कारागिरांची आहे. दरम्यान, 12 दिवसांच्या संततधार पावसामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामावर परिणाम झाला. त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे. यामुळे लाखोंचा फटका बसण्याची शक्यता आहे.नंदुरबारची गणेश मूर्ती राज्यात प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणारा हा उद्योग यंदा मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. आधीच परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे या उद्योगाला घरघर लागलेली असतांना त्यात यंदा अतिवृष्टीने भर घातली आहे. भव्य दिव्य मूर्तीयंदाही नंदुरबारातील कारागिरांनी भव्यदिव्य गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. खरेदीदार दरवर्षाप्रमाणे येतील या अपेक्षेने या मूर्त्ीना आकार देण्यात आला आहे. रक्षाबंधनच्या आत किमान 70 टक्के मूर्त्ीची बुकींग झालेली असते. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यासह गुजरात व    मध्यप्रदेशातील अनेक सार्वजनिक मंडळे त्यासाठी  प्रय}शील असतात. मूर्ती पाहून आणि त्यात आणखी आपल्या पद्धतीने थोडेफार बदल करून घेत मूर्ती बूक केली जात   असते. यंदा मात्र केवळ 30 टक्के ग्राहकांनीच तसा प्रतिसाद दिल्याचे कारागिरांनी सांगितले. पावसाचा परिणामयंदा सलग 12 ते 13 दिवसांच्या संततधार पावसाने व दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने या उद्योगाला अडचणीत आणले. पावसामुळे परराज्यातील तसेच जिल्ह्यातील मंडळांचे कार्यकर्ते देखील मूर्ती बुकींगसाठी येवू शकले नाही. आता पावसाची उघडीप मिळाल्याने बुकींगसाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतिकुल परिस्थितीत कामयेथील मूर्ती कारागिरांचे कारखाने गावातच आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत आहेत. तात्पुरते शेड उभारून तेथे मूर्ती तयार केल्या  जातात. संततधार पावसामुळे शेडला गळती लागणे, वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, पावसामुळे मजूर कामावर न येणे, कच्चा मालाचे नुकसान होणे असे प्रकार झाले. त्यामुळे 12 ते 13 दिवस काम अपेक्षीत झालेच नाही. त्याचा मोठा परिणाम या उद्योगावर झाला आहे. आता गर्दीची शक्यता..पावसाने उसंत दिली आणि गणेशोत्सवाचेही आता सर्वानाच     वेध लागल्याने मूर्ती बुकींग आणि खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारी गुजरातमधील अनेक मंडळांचे कार्यकर्ते खाजगी वाहनांनी मूर्ती पसंत करणे आणि बुकींगसाठी आले होते. त्यामुळे मूर्ती    कारागिरांकडे ब:यापैकी गर्दी झाली होती. 

यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाची किंमत वाढली आहे. त्यातच सुरत, बडोदा व अहमदाबाद येथे अतिवृष्टीमुळे हा माल मिळेनासा झाला होता. असे असतांनाही यंदा मूर्ती कारागिरांनी किंमती स्थिर ठेवल्या आहेत. नंदुरबारात अगदी पाच इंचपासून ते 20 फूटार्पयत उंचीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मोठय़ा कारखान्यांसोबतच घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यामुळे अनेक घरात देखील मूर्ती आकार घेवू लागल्या आहेत.