शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST

शासनाकडून जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार १४० डोस पाठवण्यात आले होते. यासाठी १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय यंत्रणांचे ...

शासनाकडून जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार १४० डोस पाठवण्यात आले होते. यासाठी १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय यंत्रणांचे १ हजार ९७९ फ्रंट लाईन वर्कर्स यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्या लसीकरणासाठी माहिती भरुन घेण्यात आल्यानंतर यातील वयाने कमी आणि शारीरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. याअंतर्गत दर दिवशी ७०० जणांना उद्दिष्ट ठेवत कामकाज सुरु असून सात ठिकाणी लसीकरणाचे काम सुरु आहे. प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवल्याने आतापर्यंत जिल्ह्याचे एकूण लसीकरण हे ६० टक्के झाले असल्याची माहिती समाेर आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय माहिती जाणून घेण्यात आली होती. यातून गंभीर व दुर्धर आजार तसेच वयाची पन्नाशी पार केलेल्यांना वगळण्यात आले होते, परंतु यानंतरही काहींनी जुन्या आजारांचा बहाणा करत लसीकरणाला प्रारंभी दांडी मारली होती.

लसीकरणात आशा आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यांचा या लसीकरणासाठीचा प्रतिसाद हा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात राहून पुढे राहणाऱ्या आशांचे ७० टक्के लसीकरण पूर्ण झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून त्यांचा प्रतिसाद लक्षात येतो.

लस घेतल्यानंतर हलकासा ताप तसेच इतर काही किरकोळ लक्षणे जाणवत असल्याचे लसीकरण झालेल्यांकडून सांगण्यात आले आहे. त्याउपर गंभीर असे आजारपण आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सर्व सात सेंटर्सवर प्रयत्न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.