शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्याचे ठरलेले 500 रुपये दिले नाही म्हणून टाकला डोक्यात दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पत्ता शोधून देण्यासाठी ठरलेले ५०० रुपये दिले नाही म्हणून युवकाचा डोक्यात दगड घालून खून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पत्ता शोधून देण्यासाठी ठरलेले ५०० रुपये दिले नाही म्हणून युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबारातील जगतापवाडी भागात  २७ डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात व संशयित आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश आले. संशयित युवक नंदुरबारातीलच  आहे. योगेश विठ्ठल सूळ (२४, रा.सरस्वतीनगर, ता.नंदुरबार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील जगतापवाडी चौफुलीवर २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. मयत युवकाचे नाव राकेश दिवान खर्डे (ता.आडगाव, ता.शहादा) होते. त्याच्या खिशात त्याच्या मेव्हुणीचे आधारकार्ड आढळले होते. त्या पत्त्यावर पोलिसांनी तपास केला असता तो राकेश खर्डे असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या नातेवाइकांकडे तपास करण्यात आला. कौटुंबिक वादातून तर हा प्रकार घडला नाही? याची शहनिशा करण्यात आली. स्वत: एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्याकडून काही धागेदोरे मिळतात का? याची चाचपणी केली. केवळ नातेवाइकांना भेटण्यासाठी गेला होता एव्हढीच माहिती मिळत होती. नातेवाइकांकडे काही माहिती मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी नंदुरबार शहरात तपासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी खबरींना अलर्ट केले. राजपूत यांनी आपल्या अनुभवाच्या कौशल्यावर मिळालेल्या माहितीवरून लिंक जोडणे सुरू केले.  मयत राकेश हा २७ रोजी शहादा येथून एसटी बसने नंदुरबारात आला होता. नातेवाइकांना भेटायचे, परंतु त्याच्याकडे पूर्ण पत्ता नव्हता. सायंकाळी तो बसस्थानका बाहेर अनेक वाहनचालकांना हात देऊन नातेवाइकांकडे सोडण्याचा आग्रह करीत होता. परंतु मयत हा दारू पिलेला असल्याने त्याला कुणी प्रतिसाद देत नव्हते. त्याच वेळी संशयित आरोपी योगेश सूळ हा तेथे त्याच्या दुचाकीसह आला. त्याला मयत राकेश याने नातेवाइकांकडे सोडण्याचा आग्रह केला. त्यासाठी ५०० रुपये देण्याचे कबूल केले. त्याच्या दुचाकीवर राकेश याला त्याने ठिकठिकाणी घेऊन फिरला, परंतु पूर्ण पत्ता नसल्याने नातेवाइकांपर्यंत ते पोहचू शकले नाहीत. जगतापवाडी चौफुलीवर योगेश याने ठरलेले ५०० रुपये मागितले असता ते देण्यास राकेश याने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये  वाद झाला. वादात संतापाच्या भरात योगेश याने  तेथे जवळच पडलेला सिमेंटचा दगड घेऊन त्याच्या डोक्यावर टाकला. त्यात राकेश खर्डे याला गंभीर मार लागल्याने तो कोसळला. ते पाहून योगेश सूळ याने तेथून धूम ठोकली. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत, प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, विकास अजगे, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, तुषार पाटील, रमेश पाडवी यांच्या पथकाने केले.

संशयीत पोपटासारखा बोलू लागला... मयत व संशयीत यांचे भांडण ऐकणारे दोनजण मिळाले. त्यांनी भाषा कशी होती त्याचा उल्लेक केला आणि क्ल्यू मिळाला. एलसीबीच्या पथकाने पाच ते सहा जणांवर लक्ष केंद्रित केले. परंतु अनेक बाबीतून योगेश सूळ याच्यावर संशय पक्का झाला. दोन दिवस त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याच्या हालचाली जास्तच संशयास्पद आढळल्याने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्वत: पोलीस निरीक्षक राजपूत यांनी त्याचा ताबा घेत त्याला बोलते केले. तेव्हा त्याने खुनाची कबुली देत सर्व    घटनाक्रम कथन केला. कुठलेही धागेदोरे नसतांना, काहीही पुरावा नसतांना एलसीबीने खुनाचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळविले. त्यामुळे    या भागात असलेले भीतीचे वातावरण दूर झाले.

चार पथकांनी चार प्रकारे काढली माहिती...यासाठी एलसीबीने चार स्वतंत्र पथके तयार केली होती. चारही पथकांना वेगवेगळ्या जबाबदा-या देण्यात आल्या होत्या. त्यात अनुभवी कर्मचारी देखील नेमण्यात आले होते. कुणी नातेवाइकांकडे, कुणी महिलेचा वाद आहे किंवा कसा, कुणी दारू व नशेबाज यांच्यावर तर कुणी परिसरातील आणि एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याद्वारे  शोध सुरू केला होता. राजपूत यांनी सर्व पथकांना योग्य मार्गदर्शन करून अखेर संशयीत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले. 

धागेदोरे नसतांना केला तपास...घटनेचे काहीच धागेदोरे नव्हते. संशयीताने काहीही पुरावा सोडलेला नव्हता. त्यामुळे तपासाचे आव्हान होते. परंतु आपल्या पथकांनी घेतलेली मेहनत व वरिष्ठांचे मिळालेले मार्गदर्शन यामुळे हा गुन्हा लवकर उघडकीस आणता आला.     -विजयसिंग राजपूत,पोलीस निरिक्षक, एलसीबी.