शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

पीक विम्यासाठी कापणी प्रयोग आले अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिक विमा योजनेत सहभाग देणा:या 9 हजार शेतक:यांना यंदा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिक विमा योजनेत सहभाग देणा:या 9 हजार शेतक:यांना यंदा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ पीक विमा योजनेंतर्गत कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आले असून यंदा पीक कापणी प्रयोगांचा अहवाल ऑनलाईन  सादर केला जाणार आह़े यातून भरपाईही 2020 मध्येच मिळण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती आह़े             जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग  घेऊनही शेतक:यांना भरपाई मिळत नसल्याने मोजक्याच शेतक:यांनी योजनेत सहभाग घेण्याबाबत यंदा उदासिन भूमिका घेतली होती़ यातून या योजनेला मुदतवाढ मिळूनही केवळ 9 हजार शेतकरी पिक विमा योजनेच्या कक्षेत येऊ शकले होत़े सलग  निर्माण झालेले दुष्काळ आणि त्यानंतर आलेली नापिकी यानंतरही शेतक:यांना भरपाई  मिळालेली नव्हती़ यंदाही पीक विमा शेतक:यांनी याकडे पाठ फिरवली होती़ परंतू काही शेतक:यांनी तयारी दर्शवून पिक विमा करवून घेतला होता़ यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेली अतीवृष्टी आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतीउत्पादनांची मोठी हानी झाली होती़ या पाश्र्वभूमीवर कृषी विभाग आणि विम्याचा करार करण्यात आलेली कंपनी यांच्याकडून खरीप हंगामानंतर जानेवारी महिन्यात केले जाणारे पिक कापणी प्रयोग यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरु करण्यात आले होत़े जिल्ह्यातील एकूण 36 मंडळात सुरु असलेले हे प्रयोग आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या 10 दिवसात हे प्रयोग पूर्ण होणार असल्याची माहिती आह़े यातही कापूस आणि तूर पीक अद्यापही शेतशिवारात शिल्लक असल्याने प्रयोगांना विलंब होत असल्याची माहिती आह़े यंदा करण्यात येणा:या प्रयोगात पाच वर्षाची उत्पादनक्षमता ही ऑनलाईन पडताळणी करण्यात येत असल्याने नुकसान आहे किंवा नाही, याची पडताळणी जागच्याजागीच होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आह़े 

नंदुरबार जिल्ह्यात 2019-20 या वर्षात जुलै अखेर्पयतच्या अंतिम मुदतीत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून 7 हजार 46 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होत़े शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने 3 हजार 313 शेतक:यांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात आजअखेरीस नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:यांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला आह़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांकडून 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा झाली आह़े 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा झाला होता़ 4जिल्ह्यात 36 मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने 1 हजार 835 पीक कापणी प्रयोग केले जातात़ आजअखेरीस 1 हजार 400 प्रयोग पूर्ण झाले असून त्यांचा ऑनलाईन अहवाल कृषी आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आह़े 

जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात 13 हजार 101 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होत़े यातून 19 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यासाठी शासनाकडे 42 कोटी 43 लाख 53 हजार रुपयांच्या भरपाईचा मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आह़े या प्रस्तावामुळे विमा भरपाईवर परिणाम होण्याची चर्चा सुरु होती़ परंतू प्रत्यक्षात या दोन्ही बाबी पूर्णपणे वेगळ्या असल्याचे सांगण्यात आले आह़े पीक कापणी प्रयोगादरम्यान मंडळानिहाय झालेले नुकसान आणि आलेले उत्पादन यांचा लेखाजोखा गोळा करण्यात येणार आह़े यातून एका मंडळात अधिक नुकसान होऊन उत्पादकता घटली असल्याचे समोर आल्यानंतर तेथील शेतकरी पिक विम्याच्या 100 टक्के परताव्याला पात्र ठरणार असल्याचे कामकाजातून समोर आले आह़े