शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षे घरापासून दुरावलेल्या अकोल्याच्या युवकाला गुजरातच्या दातृत्त्वाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही ...

साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. कुटुंबाने त्याचा अनेक राज्यांमध्ये शोध घेतला होता. दरम्यान, अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या बेवारस लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला बन्सीलाल केवटे मिळून आले होते. सुमारे एक हजार निराधार बेवारस लोकांना या संस्थेने आजवर घरी सोडले आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा असलेल्या दिनेश लाठिया यांनी बन्सीलाल याची सेवा शुश्रूषा करत त्याची चाैकशी करून गावाची माहिती मिळवली होती. यातून अकोला येथे संपर्क करून केवट कुटुंबीयांचा शोध घेतला होता. तब्बल १२ वर्षे घरातून बेपत्ता असलेल्या मुलाचा ठावठिकाणा मिळाल्याने केवट कुटुंबातील निवडक सदस्य त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. तेथून परत येत असताना हे सर्व सारंगखेडा येथे थांबले असताना केवट कुटुंबीयांनी लोकमत प्रतिनिधीसोबत संपर्क करत माहिती दिली.

अहमदाबाद येथे संस्थेत दाखल असलेल्या बन्सीलाल यानेही कुटुंबातील सदस्यांना ओळखले होते. खातरजमा म्हणून अकोला पोलिसांनी पत्र दिले होते. यानुसार पुतण्या अनिल राम लखन केवट, प्यारेलाल रामसुख सेट केवट, भाऊ नंदलाल राजाराम केवट, भाचा दीपेश दिनेश केवट, मुकेश राजकुमार केवट हे बन्सीलाल यास घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते.

अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दिनेश लाठिया हे काम पाहतात. समाजसेवेचे व्रत हाती घेऊन त्यांनी रस्त्यावर फिरणारे निराधार, बेवारस रोगी यांच्यासाठी २००६ पासून ही संस्था सुरू केली. या संस्थेने देशात तब्बल ६३४ जणांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचते केेले आहे. यात महाराष्ट्रातील ६५ लोकांचा समावेश आहे. संस्थाचालक दिनेश लाठिया यांना याबाबत विचारणा केली असता, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमेवरदेखील असे अनेक बेवारस निराधार लोक आढळून येतात. त्यांच्यासाठीही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या संस्थेत २६० जण असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.