शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जी.टी. पाटील महाविद्यालयात काव्यवाचन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयक जागृती व्हावी या उद्देशाने जी.टी.पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयक जागृती व्हावी या उद्देशाने जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यानिमित्त काव्यवाचन उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून पाणी, पर्यावरण या विषयावर कविता सादर करून, विद्यार्थ्यांना पाणी अडवणे व जिरवण्याची आवश्यकता असल्याचा संदेश दिला. तसेच या काव्य सादर करणा?्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत काव्यवाचन कार्यक्रमातून प्रतिभावान कलावंतांना संधी मिळून, ते स्वत:ला घडवत असतात, म्हणून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशा प्रकारचा विचार मांडला.काव्यवाचन कार्यक्रमात समाधान वाघ, कमलेश महाले, दीप पाटील, दर्शन भावसार, गौरव पुंडे, मंदाराणी सूर्यवंशी, रोशनी कोकणी, कासिम पठाण कल्याणी कळकटे रोहिणी कोकणी, शुभम सोनार, प्रतिक कदम या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर करत त्यांनी प्रेमविषयक, सामाजिक, राष्ट्रप्रेमविषयक या विषयीच्या भावना, जाणिवा यांचा उत्स्फूर्तपणे आविष्कार केला. त्यांच्या काव्याच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.माधव कदम यांनी हसतखेळत, विनोदाची उधळण करत केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश अर्जुन भामरे, डॉ. विजया पाटील, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, प्रा.एन.आर.कोळपकर, प्रा. शुभांगी देवकर, प्रा.महेंद्र गावित, प्रा. जितेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थिती होते.