शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ामुळे भूजल पातळी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुडय़ाच्या पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडाठाक पडलेल्या रोझवा लघुसिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुडय़ाच्या पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडाठाक पडलेल्या रोझवा लघुसिंचन प्रकल्पात  जलसाठा झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोझवा प्रकल्पात झालेल्या जलसाठय़ामुळे परिसरातील भूजल पातळी उचविण्यास मदत होणार आहे.तळोदा तालुक्यातील रोझवा, कोठार, अंबागव्हाण, तोलाचापडा, वरपाडा या परिसरातील शेतक:यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून          रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची  निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळापासून हा प्रकल्प परिसरातील शेतक:यांसाठी संजीवनी ठरला आहे. या प्रकल्पाची जलसाठा क्षमता 1.73 दशलक्ष घनमीटर एवढी  आहे. मात्र मागील दोन वषार्पासून दुष्काळी परिस्थितीमुळे या प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होत होता. मागीलवर्षीही हा प्रकल्प समाधानकारक भरला नव्हता. यावर्षी मात्र पहिल्याच पावसात या प्रकल्पात समाधानकारक जलसाठा  झाला आहे. मागील आठवडाभरापासून  सातपुडा पर्वतरांगेत व पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे रोझवा प्रकल्पाच्या जलसाठय़ात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने परिसरातील पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे या प्रकल्पात कधी जलसाठा होता याकडे परिसरातील शेतक:यांचे लक्ष लागून होते. या प्रकल्पात जलसाठा झाल्याने परिसरातील पाणी पातळी उंचावण्यास मदत होणार असल्याने शेतक:यांमधून समाधान व्यक्त होत आहे.