शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात भव्य एकता रॅलीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 12:47 IST

शहादा : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली़ 100 पेक्षा अधिक कलापथके, युवक, युवती यांच्यासह ...

शहादा : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली़ 100 पेक्षा अधिक कलापथके, युवक, युवती यांच्यासह हजारो नागरिकांच्या सहभागाच्या या रॅलीद्वारे सरदार पटेलांना अभिवादन करण्यात आल़े  शहरातील विविध संस्था, संघटनांनी मिळून ही राष्ट्रीय एकता रॅली काढली. रॅलीत सजीव देखाव्यांसह प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आले.शहाद्यात प्रथमच गुजर्र समाज संस्था व संघटनांतर्फे सरदार पटेल जयंती व रॅलीचा हा उपक्रम घेण्यात आला. शुभारंभ माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार अमरिशभाई पटेल, आमदार उदेसिंग पाडवी, सातपुडा साखर कारखाना अध्यक्ष दिपक पाटील, नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, माजी नगराध्यक्षा कांताबेन पाटील, सुभाष पाटील, नगरसेवक प्रा.मकरंद पाटील, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, स्वाभिमानीचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, कंचन पाटील, माधवी पाटील, प्रिती पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ़ कांतीलाल टाटिया, डॉ़ किशोर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. रॅली शहरातील विविध भागातून फिरविण्यात आली. रॅलीचे मुख्य आकर्षण असलेला 100 मिटर लांबीचा तिरंगा महिलांनी अभिमानाने मिरविला. युवतींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले होते. मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले. जागोजागी थंड पेय, नाश्ताची सोय करण्यात आली होती. रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. रॅलीच्या मागोमाग विविध शहर ग्राम गुजर समाज मंडळाच्या कार्यकत्र्यानी स्वच्छता अभियान राबविले. रॅलीत रामचंद्र पाटील, ईश्वर पाटील, किशोर पाटील, श्रीपत पटेल, के.डी.पाटील, अॅड.गोविंद पाटील, हरी दत्तू पाटील आदींसह विविध धर्मीय व पक्षीय पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी राकेश पाटील, प्राचार्य ईश्वर पाटील, गिरीश पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, तुषार पाटील, अनिल पटेल, मुन्ना पाटील, जयदेव पाटील, वैकुंठ पाटील, भरत पाटील, संजय पाटील, उमाकांत पाटील, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.