शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम ६०० कर्मचारी ; तहसीलदारांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले तरी सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले तरी सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना शहाद्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.           तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्राथमिक स्तरावर ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांतर्गत शहरातील चावरा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शुक्रवारी दोन सत्रात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार डाॅ. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडेव कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची माहिती प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली. तसेच मॉकपोल, विविध नमुन्यातील घोषणापत्रे इतर नमुने यांची माहिती भरण्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुका कोविड-१९ काळात होत असल्याने मतदाराला मतदानावेळी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रशिक्षणादरम्यान कोविड-१९ च्या नियमांचे पालन करूनच बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.