शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

टारगटांच्या छेडखानीत बालिका जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : शाळा सुटल्यानंतर घरी परतणा:या पाचवीच्या विद्यार्थिनीची छेड काढून दोघांनी तिच्या गळ्यातील स्कार्फ ओढत जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : शाळा सुटल्यानंतर घरी परतणा:या पाचवीच्या विद्यार्थिनीची छेड काढून दोघांनी तिच्या गळ्यातील स्कार्फ ओढत जखमी केल्याची घटना मोदलपाडा ता़ तळोदा येथे घडली़ स्कार्फचा फास लागल्याने विद्यार्थिनी अत्यवस्थ झाली़ तळोदा शहर आणि तालुका परिसरातील टारगटांचा प्रश्न घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आह़े    मोदलपाडा येथील संत गुलाम महाराज शाळेची  पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनी बुधवारी सकाळी 11 वाजता शाळेतून मैत्रीणीसोबत पायी शेलवाई येथे घराकडे जाण्यासाठी निघाली होती़ दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला थांबून असलेल्या विशाल मोहनसिंग वळवी व विलास कांतीलाल वळवी दोघे रा मोदलपाडा  तिची छेड काढली होती़ यादरम्यान दोघांना घाबरुन विद्यार्थिनी पळत सुटल्या होत्या़ यात पिडित विद्यार्थिनीनेही सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला असता, दोघांपैकी एका तिच्या गळ्यातील स्कार्फ ओढल्याने  गळ्याला फास लागून बालिका जमिनीवर कोळसली़ यातून तिच्या गळ्यावर तसेच डोक्याला गंभीर जखमा झाल्या़ पिडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांवर पोलीसांनी कारवाई केली आह़े  घटना पाहणारे मनोहर विरसिंग पाडवी यांनी विशाल  वळवी व विलास वळवी यांनी या दोघांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्यांनाही दमदाटी केली होती़ घटनेबाबत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र जाधव करत आहेत़ दोन दिवस उलटल्यानंतर ही घटना उजेडात आल्यावर तळोदा व परिसरातील पालकांनी टारगटांच्या कृत्याचा निषेध केला होता़ गेल्या काही दिवसांपासून परिसरातील युवकांचा उच्छाद त्रासदायक ठरत आह़े 

घडलेल्या घटनेनंतर शाळेच्या शिक्षकांसह मोदलपाडय़ातील पालकांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले होत़े अवघ्या पाचवीच्या विद्यार्थिनीवर गुदरलेल्या या प्रसंगामुळे टारगटांच्या विकृतीचा निषेध करण्यात येत होता़ तळोदा बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना ग्रामीण भागात समोर आलेल्या घटनेने पालकांनी नाराजी व्यक्त केली आह़े पोलीसांकडून दोघांवर कारवाई झाली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आह़े