शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

स्ववर्गणीतून शाळेला सिलींडर व शेगडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कुढावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी स्वत: वर्गणी करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कुढावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी स्वत: वर्गणी करुन शाळेला नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन दिली.सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दररोज दुपारी शाळेतील मुलांना सकस आहार देण्यात येतो. या योजनेअंतर्गत शाळेतील मुला-मुलींना पोषण आहारासाठी दररोज अन्न शिजविण्यासाठी सुके जळाऊ लाकूड वापरावे लागते. लाकूड नियमितपणे वेळेवर मिळत नसल्याने त्याचा त्रास परिसरातील सर्व प्राथमिक शाळांना होत असतो. जळाऊ लाकडाच्या अडचणीपासून कायमची सुटका मिळावी व आपल्या प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना दररोज ताजे, सकस व चविष्ट आहार देता यावे या उद्देशाने कुढावद येथील शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र गोविंद पाटील यांनी शाळेतील इतर शिक्षक सुनील पाटोळे, कैलास चव्हाण व विठ्ठल कुरेची यांची मिटींग घेऊन जळाऊ लाकडाच्या समस्येवर कायमचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापल्या परीने स्वत:च्या कमाईतून आर्थिक मदत करून आपल्या शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन द्यावी ही कल्पना सुचवली. सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या कल्पनेला एकमुखाने व सर्वसंमतीने मान्यता देऊन दुस:याच दिवशी नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन शाळेला भेट देण्यात आली. अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले.