शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजना आता मार्गी लावाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:22 IST

नरेंद्र गुरव लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासून ...

नरेंद्र गुरवलोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. मात्र दोन्ही बॅरेजवर असलेल्या २२ उपसा सिंचन योजना  बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा शेतीसाठी काहीही उपयोग होत नाही. जलसंपदामंत्री यांनी या बॅरेजेसची पाहणी उपसा योजनांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.सविस्तर वृत्त असे की,  प्रकाशा व सारंखेडा येथे कोट्यवधी रुपये खर्च करुन बॅरेज उभारण्यात आले आहेत. मात्र या बॅरेजेसचा शेतकऱ्यांसाठी काहीच उपयोग  होत नसल्याने आजही शेतकरी पाण्यासाठी तहानलेलाच आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी भेटी देतात, पाहणी करतात, मात्र उपसा योजना कार्यान्वित होण्यासाठी काहीही हालचाल होत नसल्याने आजही या दोन्ही बॅरेजेसवरील २२ उपसा सिंचन योजना बंद आहेत. उपसा योजना कार्यान्वित होत नसल्याने ज्या उद्दिष्टाने हे बॅरेजेस उभारले आहेतते उद्दिष्ट मात्र अद्यापही सफल झालेले नाही. बॅरेजमध्ये साठवलेले पाणी दरवर्षी पावसाळा आला की सोडण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही बॅरेजेसवरुन पाणी उचलण्याची परवानगी घेतली आहे त्यातून फक्त ९०० ते एक हजार हेक्टर शेतजमिनीला फायदा होत आहे. या दोन्ही बॅरेजेसवरील उपसा योजना सुरू झाल्या तर सुमारे १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.प्रकाशा येथील बॅरेजच्या उद्घाटनाच्यावेळी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांनी बॅरेज पूर्ण झाल्यानंतर तापी खोरे विकास महामंडळाच्या सहाय्याने शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार तापी खोरे विकास महामंडळाने बॅरेज ताब्यात घेऊन सर्व उपसा योजना सुरू करून जर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवले तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असे प्रकाशा येथील केदारेश्वर उपसा सिंचन योजनेचे माजी अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले.

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजवरील उपसा योजनाश्रीदत्त उपसा योजना सारंगखेडा,  हरितक्रांती उपसा योजना पुसनद, उत्तरतापी उपसा योजना बिलाडी, भद्रेश्वर उपसा योजना कोरीट,  केदारेश्वर उपसा योजना प्रकाशा,  सिद्धेश्वर उपसा योजना लहान शहादे, जनता उपसा योजना कोपर्ली,  विश्वतीर्थ उपसा योजना काकर्दे, राधेकृष्ण उपसा योजना हाटमोहिदे, देवकीनंदन उपसा योजना शिरुड, दीपकनाथ उपसा योजना समशेरपूर तर सारंगखेडा बॅरेजवर असलेल्या उपसा योजनांपैकी शहादा तालुक्यात तीन तर शिंदखेडा तालुक्यात आठ योजनांचा समावेश आहे. त्यात गायत्री उपसा योजना कळंबू, कामेश्वर उपसा योजना बामखेडा, रामकृष्ण उपसा योजना कहाटूळ, जय भवानी उपसा योजना निमगूळ, भाग्यलक्ष्मी उपसा योजना लंगाणे, रवीकन्या उपसा योजना लोहगाव,  विद्यावर्धिनी उपसा योजना धमाणे, आशापुरी उपसा योजना पाटण, मंदाने उपसा योजना दाऊळ, कमलताई पाटील उपसा योजना विरदेल, अक्कडसे उपसा योजना नेवाडे. या उपसा योजनांपैकी काहींचे काम अपूर्ण तर काहींचे कामच सुरू झाले नसल्याने त्या अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत.