शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात फ्रंट लाईन कर्मचारीच पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या ­१२ हजार ७०१ फ्रंट लाईन वर्कर्स आणि ९ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या ­१२ हजार ७०१ फ्रंट लाईन वर्कर्स आणि ९ हजार ९३८ फिल्ड हेल्थ वर्कर अशा एकूण २० हजार आरोग्य कर्मचा-यांपैकी एकूण सहा कर्मचा-यांनी आतापर्यंत लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरण पूर्ण करणारे ५२ टक्के फ्रंटलाईन वर्कर्स असून हे सर्व आरोग्य विभागात सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी आहेत. शासनाकडून जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार १४० डोस पाठवण्यात आले होते. यासाठी १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय यंत्रणांचे १ हजार ९७९ फ्रंट लाईन वर्कर्स यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.  शासकीय आणि खाजगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्या लसीकरणासाठी माहिती भरुन घेण्यात आल्यानंतर यातील वयाने कमी आणि शारिरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. यांतर्गत दर दिवशी ७०० जणांना उद्दीष्ट्य ठेवत कामकाज सुरु असून सात ठिकाणी लसीकरणाचे काम सुरु आहे. प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेत काम करणा-या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साह दाखवल्याने आतापर्यंत जिल्ह्याचे एकूण लसीकरण हे ६० टक्के झाले असल्याची माहिती समाेर आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी झालेल्या कर्मचा-यांची वैद्यकीय माहिती जाणून घेण्यात आली होती. यातून गंभीर व दुर्धर आजार तसेच वयाची पन्नाशी पार केलेल्यांना वगळण्यात आले होते. परंतू यानंतरही काहींनी जुन्या आजारांचा बहाणा करत लसीकरणाला प्रारंभी दांडी मारली होती. 

लसीकरणात आशा आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यांचा या लसीकरणासाठीचा प्रतिसाद हा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात राहून पुढे राहणा-या आशांचे ७० टक्के लसीकरण पूर्ण झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून त्यांचा प्रतिसाद लक्षात येतो. 

लस घेतल्यानंतर हलकासा ताप तसेच इतर काही किरकोळ लक्षणे जाणवत असल्याचे लसीकरण झालेल्यांकडून सांगण्यात आले आहे. त्याउपर गंभीर असे आजारपण आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सर्व सात सेंटर्सवर प्रयत्न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.