शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारची पहाट त्यांच्यासाठी ठरली होती जीवघेणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:44 IST

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शुक्रवारची पहाटे जाग आली ती घरात शिरलेल्या पाण्याने.. नेहमीप्रमाणे प}ी पहाटे ...

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शुक्रवारची पहाटे जाग आली ती घरात शिरलेल्या पाण्याने.. नेहमीप्रमाणे प}ी पहाटे उठली परंतु बेडवरुन पाय जमिनीला लागताच थंडगार पाण्याच्या स्पर्शाने ती घाबरली.. पायाला थंडगार काय लागते म्हणून तिने खाली पाहिले आणि घरात चोहीकडे पाणीच पाणी बघून ती घाबरली.. हा अनुभव होता शहादा येथील दिलीप आहेर यांचा.बुधवारपासून सुरु झालेली पावसाची संततधार शुक्रवार्पयत सुरु होती. सलग सुमारे 36 तास झालेल्या या पावसाने संपूर्ण  तालुक्यात हाहाकार माजवला. घरात पाणी शिरल्याचा अनुभव दिलीप आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना शेअर केला. दोंडाईचा रोडवर, सप्तशृंगी मंदिरासमोर दिलीप आहेर यांचे गॅरेज व त्यामागे घर आहे. दिलीप आहेर हे प}ी जया व मुलगा निलेशसोबत रहातात. त्यांच्या शेजारीच त्यांची विधवा भावजयी शैला ह्या आपल्या अंजली व रूना या दोन मुलींसह राहतात. शुक्रवारी दोन्ही कुटुंब आपापल्या घरात झोपलेले असताना पहाटे चार वाजता जयाबाई यांना जाग आली आणि संपूर्ण घरात पाणीच पाणी बघून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी लगेच पती व मुलाला उठवून परिस्थितीची जाणीव करुन दिली. शेजारी रहाणा:या शैला यांनाही पहाटे साडेचार वाजता घरात पाणी शिरल्याचे समजताच त्यांनी मुलींना उठवले व सामानाची बांधाबांध सुरु केली. दोन्ही घरात मिनिटागणिक पाण्याची पातळी वाढत असल्याने  काळजी पसरली. हिंमत धरत सर्वानी आलेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सामानाची आवरसावर केली. धान्याच्या कोठीत पाणी गेल्याने धान्य ओले झाले होते, कपडे ओले झाले होते. गँरेजमध्येही  मशिनरी पाण्यात बुडाली. जुना मोहिदा रोडवरील पाटचारीचे पाणी परिसरात पसरल्यामुळे तेच पाणी या दोन्ही घरात शिरले होते. दुपारी 12 वाजता पाऊस थांबल्यावर घरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली. रात्री आठ वाजता घरातील सर्व पाणी ओसरले पण घरात मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याने रात्री झोपणेही अशक्य झाल्याने दुस:या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली. घरात सुमारे दोन फुट पाणी असूनही एकाही शासकीय अधिकारी किंवा पालिकेकडून दखल घेतली गेली नसल्याचे दिलीप आहेर यांनी सांगितले. शनिवारी सकाळी घरातील गाळ काढण्यात आला. सुदैवाने पाऊस थांबल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी दोन दिवस दोन्ही परिवारातील सदस्यांचा जीव टांगणीला लागल्याचे अंजलीने सांगितले.