शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वन अतिक्रमणधारकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वनजमिनीचे प्रलंबित दाव्यांबरोबरच मिळालेल्या वनपट्ट्यांची मोजणी तातडीने होऊन सातबारे उतारे उपलब्ध होण्यासाठी गेल्या दोन-तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वनजमिनीचे प्रलंबित दाव्यांबरोबरच मिळालेल्या वनपट्ट्यांची मोजणी तातडीने होऊन सातबारे उतारे उपलब्ध होण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याची व्यथा वन अतिक्रमणधारकांनी आमदार राजेश पाडवी यांच्यापुढे मांडली. दरम्यान, पाडवी यांनी प्रलंबित दाव्यांबाबत संबंधित मंत्रालयात पाठपुरावा करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन वनजमीन अतिक्रमणधारकांना दिले. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.तळोदा तालुक्यातील अमोनी येथे वन अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांबाबत आमदार राजेश पाडवी यांनी बैठक घेतली. या वेळी तालुका वनसमितीचे सदस्य दाज्या पावरा, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष छगन कोठारी, तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी, अमोनीचे माजी सरपंच चंदन पाडवी, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष भिमा पाडवी, उपसरपंच दिलीप पावरा, पिसा तडवी, गुड्डू वळवी उपस्थित होते.प्रारंभी आमदार पाडवी यांनी अतिक्रमणधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिक्रमणधारकांनी मोठ्या संख्येने समस्या उपस्थित केल्या. गेल्या अनेक वर्षापासून आमचे वनदावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत अजूनही प्रशासन स्तरावर कार्यवाही केली जात नाही. जो अधिकारी येतो तो केवळ आम्हाला आश्वासनच देत असतो. एवढेच नव्हे तर तालुक्यात हजारो वनपट्टेधारकांची वनजमिनीची अजूनही जीपीएस प्रणालीतून जमीन मोजण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला जमिनीचे सातबारेही उपलब्ध होत नाही. सातबाऱ्यांअभावी राष्टÑीयकृत व सहकारी बँक पीक कर्ज देत नाही. आम्ही सातबारा उतारा मिळण्यासाठी अक्षरश: वैतागलो असल्याची व्यथा उपस्थित अतिक्रमणधारकांनी बोलून दाखवली. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उदासीन भूमिका घेतल्यामुळे आमचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोप वनजमीन अतिक्रमणधारकांनी या वेळी केला.आमदार पाडवी यांनी वनपट्टेधारकांच्या प्रलंबित दाव्यांसंदर्भात संबंधित मंत्रालय व वरिष्ठ अधिकाºयांकडे ठोस पाठपुरावा करून तशी कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीत अमोनी परिसरातील वनजमीनधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत यशवंत पाडवी, दाज्या पावरा यांनीही मार्गदर्शन केले. आभार चंदन पाडवी यांनी मानले.

  • उपविभागीय वनसमितीची आज बैठक
  • वनअतिक्रमण जमीन धारकांचे प्रलंबित प्रश्न तातडने सोडविण्यात यावेत यासाठी उपविभाग स्तरीय समितीचे गठन जिल्हाधिकाºयांनी केले होते. या समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे अशासकीय सदस्य व पंचायत समितीचे सदस्य दाज्या पावरा यांनी सांगितले. समितीच्या पुनर्गठणानंतर पहिलीच बैठक समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकाºयांनी आयोजित केली आहे. निदान वनपट्टेधारकांच्या वनपट्ट्यांबाबत आढावा तरी घेतला जाईल. त्यामुळे वनजमीन धारकांच्या आशांवर फुंकर घातली जाईल.