शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातून विषबाधेने 11 बालिका रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती़ त्यांना तात्काळ बोरद व तेथून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े यातील दोघींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेल़े मंगळवारी सायंकाळी सात वाजता त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमातील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होत़े यानंतर काही वेळात बालिकांना उलटय़ा आणि अतीसाराचा त्रास सुरु झाला होता़ प्रशासनाने तातडीने मुलींना बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत उपचार सुरु केले होत़े परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ रुग्णालयात करमीला रमेश पाडवी (14), शर्मिला लालसिंग वळवी (15), सपना सायसिंग पाडवी (15), प्रियंका हरीश्चंद्र वळवी (13), ज्योती शत्रुघA ठाकरे (15), अश्विनी अंबरसिंग मोते (15), अश्विनी कोरजी नाईक (15), निलिमा रामसिंग पाडवी (14), लिना रावल्या तडवी (10), निशा शिवाजी तडवी (11), लक्ष्मी पाडवी (14) या बालिकांवर उपचार सुरु होत़े याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ़ विजय पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडून उपचार सुरु आहेत़ दरम्यान लिना तडवी आणि निशा तडवी या दोघींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े आश्रमशाळेच्या गृहप्रमुख निमा गावीत, शैला वसावे, शिक्षक विष्णू पाटील यांनी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले होत़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून विद्यार्थिनींच्या प्रकृतीची पाहणी केली़ 

विद्यार्थिनींना पाणी किंवा जेवणातून विषबाधा झाली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिका:यांनी वर्तवला आह़े दरम्यान त:हावद येथे दोन दिवसापासून विज पुरवठा बंद होता़ यामुळे विद्यार्थिनी दोन दिवसांपासून हातपंपाचे पाणी पित असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आह़े यातूनच त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े ूउपजिल्हा रुग्णालयातील 9 आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही बालिकांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आह़े