शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यासाठी नवीन पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा सुरू; एक एकर जागाही मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

शहादा पोलीस ठाणांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे ...

शहादा पोलीस ठाणांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयात पाठिवण्यात आलेला आहे. वाढती लोकसंख्या आणि इतर बाबी लक्षात घेता त्या पोलीस ठाण्यावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे लवकरात लवकर व्हावे यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले. नवीन पोलीस ठाण्यासाठी किमान ९० पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकारी असे मिळून जवळपास १०० पेक्षा अधिक जणांची गरज असते. त्यासाठी पदनिर्मिती आणि इतर बाबींसाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. जर आहे त्या मणुष्यबळात पोलीस ठाणे सुरू करावयाचे असेल तर त्यालाही परवानगी दिली जाते; परंतु जिल्हा पोलीस दलात आधीच रिक्त जागा आहेत. आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे नवीन पदनिर्मिती करूनच शहादा ग्रामीण पोलीस ठाणे सुरू करावे यासाठी प्रयत्न राहणार आहे. शहादा ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी महसूल विभागाकडून एक एकर जागादेखील मंजूर करून घेतली आहे.

याशिवाय नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासाठीदेखील नवीन व स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे कामकाज पालिकेच्या सामाजिक सभागृहात सुरू आहे, तर शहर पोलीस ठाणे महसूल विभागाच्या इमारतीमध्ये आहे. त्यांना स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी मागणी असल्याचेही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले.