शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्याने तळोदा तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले होत़े खर्डी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले होत़े खर्डी व भवर नदीचे पुराचे पाणी नदी काठच्या वसाहती, मुख्य बाजारपेठेत शिरल्याने घरांचे नुकसान झाले आह़े पुराच्या पाण्यामुळे तळोदा शहर पूर्णपणे जलमय झाले होत़े यातून पुलांच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ तळोदा शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात गेल्या सात आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आह़े त्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ शहरातून वाहणा:या खर्डी व भवर नदीचे पाणी कॉलेजरोडकडून सखल भागात साचल्यामुळे रस्त्यावरील घरे, दुकाने पाण्यात गेली़ यातून व्यावसायिकांचे नुकसान झाल़े खर्डी नदी काठालगत डीबी हाटी, मोठी हाटी, विद्यानगरी, कालिका माता मंदीर गल्ली, संत रोहिदासवाडा आणि उपजिल्हा रुग्णालय आवारात पाणी गेल्याने नुकसान झाल़े भवर नदीचे पाणी कॉलेज रोडवरील भरवाड वसाहतीत शिरल्याने 20 घरांचे नुकसान झाल़े शहरालगतच्या नवीन वसाहतींमुळे गटारींची व्यवस्था नसल्यामुळे वसाहतींमध्ये प्रचंड पाणी साचले होत़े पुरामुळे अक्कलकुवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़  मोठय़ा कालावधीनंतर खर्डी नदीला पूर आल्यामुळे शहरातील नागरिकांनी काठावर गर्दी केली होती़ यातून अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावे यांनी याठिकाणी भेटी देत पाहणी केली़ रविवारी दुपार्पयत नागरिक व व्यावसायिक घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होत़े जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला़ फ्यूजपेटय़ांमध्ये पाणी गेल्याने वीज पुरवठा दिवसभर बंद होता़ शहरातील ज्या घरात नुकसान झाले आहे अशा ठिकाणी पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथकांची नियुक्ती केली आह़े प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी भेट देत पाहणी केली़ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े 

मोड येथील सरदार सरोवर बाधितांच्या वसाहतीत पाणी शिरल्याने 36 घरांचे नुकसान झाल़े प्रशासनाने त्यांना मोड येथील शाळेत स्थलांतरित करत सोय केली़ चौगाव, रेवानगर, दलेलपूर, त:हावद, सरदारनगर याठिकाणीही पुराचे पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आह़े पावसामुळे शहर आणि तालुक्यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नसल्याचे तालुका प्रशासनाकडून कळवण्यात आले आह़े