शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मिळणार 1 कोटी रुपयांचा तातडीचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार दिवसात त्यांच्या खात्यावर 1 कोटी रुपयांचा मदतनिधी वर्ग करण्याची तयारी सुरु केली आह़े अंशत: बाधित, पूर्णपणे जमिनदोस्त घरे, जनवारे व मयत व्यक्तींच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आह़े      नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांना अतीवृष्टीचा फटका बसला होता़ यातून नदी-नाल्यांना पूर येऊन घरांची पडझड तसेच गुरांची मृत्यू झाला होता़ जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने तसेच अतीवृष्टीमुळे भिंती पडल्याने सात जणांना जीव गमावावा लागला आह़े या सर्व स्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरु केले होत़े रविवारी रात्री उशिरा पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी तालुकानिहाय अहवाल तयार करुन तो प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता़ जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोषागार विभागाकडे देण्यात येणा:या निधीच्या मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार मंगळवारी सकाळी निधीची मागणी करुन तातडीने बाधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आह़े 

्रप्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 7 मयतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात आले आहेत़ भिमसिंग वळवी (धानोरा), शेख चांद (नवापुर), पवन पवार (असलोद), सुकराम ठाकरे (पाडळदा), लिलाबाई पाडवी (मौलीपाडा), कांताबाई भिल (रायखेड) व गणेश पाडवी (आमखेडीपाडा) यांचा अतीवृष्टीदरम्यान मृत्यू झाला आह़े पुराच्या पाण्यात 6 मोठी जनवारे वाहून गेली होती़ त्यांच्या मालकांना प्रत्येकी 30 हजार, 78 लहान जनावरांच्या मालकांना प्रत्येकी 3 हजार, 4 बैलांच्या मालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े सर्व सहा तालुक्यात 2 हजार 372 घरांची अंशत: पडझड झाली होती़ या लाभार्थीना प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांची मदत दिली जाणार आह़े तर 57 घरे पूर्णपणे कोसळल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाल्याने त्यांना प्रत्येकी 95 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े पंचनाम्यांदरम्यान तलाठी व मंडळाधिका:यांनी बँक खात्यांची माहिती घेतल्याने आठवडाभरात त्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा होणार आह़े 

शासनाने काही महिन्यांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी साधारण 11 हजार रुपयांचा मदतनिधी प्रस्तावित आह़े यात 6 हजार रुपये घराची दुरुस्ती, प्रत्येकी अडीच हजार रुपये घरातील भांडी व कपडय़ांसाठी वितरीत करण्याचे निश्चित करण्यात आले आह़े अशात जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांर्पयत देण्याचे नियोजन करण्यात आल्याने लाभार्थीकडून नाराजी व्यक्त होत आह़े प्रशासनाकडून शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ या पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे देण्यात येणार आहेत़ त्यानुसार शासन येत्या काळात मदतनिधी जाहिर करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांची जमिन खरडली गेल्याने त्यांना किमान हेक्टरी 1 लाख रुपयार्पयत मदत मिळण्याची अपेक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े