शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात पाच बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील  दापूर या गावी  बिबटय़ा वाघाने एका शेतक:याच्या  घरात प्रवेश करून पाच बोकड ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील  दापूर या गावी  बिबटय़ा वाघाने एका शेतक:याच्या  घरात प्रवेश करून पाच बोकड ठार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मात्र या घटनेबाबत वनविभागाने काहीही कार्यवाही  केलेली नाही. बिबटय़ाने  नागरी वस्तीत मुक्तपणे संचार केला आहे. ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विसरवाडीपासून 10 किलोमीटर अंतरावरील दापूर येथील शेतकरी होमाजी काळ्या गावीत हे रात्रीच्यावेळी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असताना मध्यरात्री बिबटय़ाने घराच्या मागील बाजूने कूड फाडून घरात प्रवेश केला. बाजूच्या घरात होमाजी गावीत याने आपली पाळीव जनावरे शेळ्या व बोकड बांधून ठेवले होते. बिबटय़ाने पाच बोकडांवर हल्ला करुन  ठार केले. घरात रक्ताचा सडा पसरला होता. बोकड व शेळ्यांचा जोरात आवाज ऐकून  होमाजी गावीत यांनी मागील दार उघडले तेव्हा त्यांना बिबटय़ा वाघ दिसला. भीतीपोटी त्याचक्षणी त्यांनी दार बंद करुन परिवारासह पळ काढला.  रात्रभर नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला. सकाळी घाबरलेल्या अवस्थेत घरी जावून पाहिले असता बिबटय़ाने पाच बोकडांना ठार केल्याचे त्यांना दिसले. घरात दरुगधी व रोगराई पसरु नये म्हणून त्यांनी गावक:यांसमक्ष खड्डा खोदून  बुजून दिले. पाच बोकड एकाचवेळी बिबटय़ाने ठार केल्याने गरीब शेतक:याचे 20 ते 25 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.  हे क्षेत्र चिंचपाडा वनविभागांतर्गत येते. मात्र अद्याप वनविभागामार्फत कुठलीही चौकशी अथवा पंचनामा करण्यात आलेला नाही. बोकड ठार झाल्याने गरीब शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.अतिदुर्गम भागात वसलेले दापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून दोन बिबटय़ांनी धुमाकूळ घातला असुन आतापावतो  ब:याच शेतक:यांची पाळीव जनावरे फस्त करून त्यांचे नुकसान केले आहे .मुख्यत: बिबटय़ा रात्रीच्यावेळी गावात मुक्तसंचार करतात आणि सापडेल त्या जनावरांवर झडप घालून ठार करतात.  बिबटय़ाबाबत चिंचपाडा वनविभाग कार्यालयात  तक्रार करुनही चौकशी व पंचनामा केला जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरी वस्तीत प्रवेश करून पाळीव जनावरे ठार करणा:या बिबटय़ांना पिंज:यात जेरबंद करून बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतक:यास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

रांझणी शिवारात बिबटय़ाने कुत्रा केला फस्ततळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात हिरालाल विजयसिंग पावरा यांच्या झोपडीच्या परिसरातून बिबटय़ाने कुत्रा फस्त केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. हिरालाल पावरा व रखवालदार किसन मोत्या वसावे यांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जेवण झाल्यानंतर झोपडी परिसरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याला भाकर टाकली. कुत्रा भाकर घेऊन थोडा लांब अंतरावरच गेला असता बिबटय़ाने कुत्र्यावर झडप टाकून कापसाच्या शेतात जाऊन कुत्रा फस्त केला. कुत्र्याचा आवाजामुळे झोपडीतील विजयसिंग पावरा व किसन वसावे हे  झोपडीच्या बाहेर आले व घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी प्रतापपूर येथील काही तरुणांना फोन करून घडलेला प्रकार  सांगितल्यानंतर काही युवकांनी शेताकडे धाव घेतली. कापसाच्या शेतात त्यांनी बिबटय़ाचा शोध घेण्याचा प्रय} केला असता त्यांना बिबटय़ाच्या पायाचे ठसे  आढळून आलेत. रात्री उशिरार्पयत या युवकांनी शेतात फटाके फोडून बिबटय़ाला हुसकावून लावण्याचा प्रय} केला. 15 दिवसापूर्वीही या झोपडीच्या परिसरातील एक कुत्रा बिबटय़ाने फस्त केला असून वनविभागाकडे बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले जात आहे.