शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

घरीच होणार पाच वेळची नमाज अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 13:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन व संचारबंदी असुनही मुस्लीम समाजात रमजानचा उत्साह कायम आहे. आजपासुन रमजानच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन व संचारबंदी असुनही मुस्लीम समाजात रमजानचा उत्साह कायम आहे. आजपासुन रमजानच्या पवित्र पर्वास प्रारंभ झाला. रमजान महिन्यास इस्लाम धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे. एक महिन्याचे उपवास करुन अल्लाहला राजी करण्याचा प्रयत्न या महिन्यात मुस्लिम समाजबांधव करीत असतात. बालकांपासुन वयोवृध्द अश्या सर्व वयोगटातील नागरिक रोजा करुन पाचही वेळची नमाज कसोशीने अदा करतात.पवित्र रमजान महिन्यात रात्रीच्या वेळेस समाजबांधव एकत्रित येउन तरावीहची नमाज अदा करीत आले आहेत. कोरोनामुळे सामाजिक दुरी ठेवणे आवश्यक असल्याने यंदा मात्र दिवसातील पाचवेळची नमाज समाजबांधवांकडुन घरीच अदा केली जात आहे. तरावीहची नमाजमधे कुराणचे पठण करण्यात येते. प्रत्येकाला कुराण तोंडीपाठ नसल्याने तरावीहच्या घरी अदा होणार्या नमाजला बहुसंख्य जणांना मुकावे लागत आहे. मशिद बंद ठेवता येत नसल्याने प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत मशिदीत सामाजिक दुरी ठेउन पाचजण मिळुन नमाज अदा केली जात आहे.उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतांना रमजानच्या रोजाची सुरुवात झाली आहे. चौदा तास तीस मिनिटांचा पहिला रोजा असुन तिसाव्या रोजा पावेतो हा कालावधी पंधरा मिनिटांनी वाढणार आहे. उन्हाळा तिव्र असतांनाही रोजा करणार्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. लॉकडाउन व त्या अनुषंगाने बाजाराची वेळ पाहता रमजानच्या औचित्याने भरणार खमंग चवीच्या वस्तु व शितपेय तथा खाद्यपदार्थांची सजणारी दुकाने थाटली जात नसल्याने इफ्तारसाठी घरच्याघरी तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरच रोजेदारांना समाधान मानावे लागत आहे.जागतिक समस्या झालेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे खानकाही व्यवस्थाही यंदा संपुर्ण देशात प्रभावित झाली आहे. मोठे मद्रेश्यात ही परंपरा राबविण्यात येते. त्यात एक महिना घरापासुन लांब राहुन मशिदीत वास्तव्य करुन एक महिन्याचा ऐतेकाफ करुन अल्लाहची इबादत करुन त्यास राजी करण्याचा प्रयत्न होत असतो. सामाजिक दुरीमुळे यंदा एतेकाफ व खानकाही व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तरीही समाजबांधवांनी आपल्या घरातच राहुन रमजान मधील सर्व सोपस्कर पार पाडुन अल्लाहला राजी करण्याचा व कोरोनाच्या जिवघेण्या संकटापासुन जगाला मुक्त करण्यासाठी दुवा करण्याचे आवाहन समाजातील आगेवान धर्मगुरुंकडुन समाजबांधवांना करण्यात येत आहे. प्रत्येक नमाजनंतर व पहाटेच्या प्रहरी तहाज्जुदच्या नमाजमधुन दुवा करण्याचे या आवाहनातुन अधोरेखित करण्यात येत आहे.