शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे धावपटूच्या कागदपत्रांची राखरांगोळी

By admin | Updated: March 2, 2017 23:11 IST

मदतीची अपेक्षा : धडगाव तालुक्यातील आसलमालपाडा येथील घटना

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात राहूनही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाºया धावपटूच्या घराला लागलेल्या आगीत त्याच्या बक्षिसे, मेडल्स आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांची राखरांगोळी झाली़ या धावपटूची शासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ धडगाव तालुक्यातील चिंचकाठी या दुर्गम भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया आसलमालपाडा येथील तीन घरे जळून खाक झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली होती. यात गोरजी पाडवी यांचे घरही बेचिराख झाले़ गोरजी पाडवी हे कामानिमित्त धडगाव येथे गेले असताना घर बंद होते़, तर त्यांचा मुलगा राष्ट्रीय धावपटू संतोष पाडवी हाही बाहेरगावी होता़ या आगीतील घरातील सर्व सामान, पैसे, धनधान्य, पाळीव जनावरे आदीसह विविध साहित्य जळून खाक झाले़ यातच संतोष याची शैक्षणिक प्रमाणपत्रे, त्याने तालुका,जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कमावलेली बक्षिसे, प्रमाणपत्रे जळून खाक झाली आहेत़ आग लागली त्यावेळी संतोष पाडवी हा पत्नी आणि आईसह तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे होता़ तर त्याच्या घरात नातलगाचा मुलगा मुक्कामी होता़ त्याने ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही आग विझली नाही़           दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क नसल्याने या आगीच्या घटनेची माहिती बाहेर पडू शकली नाही़ दरम्यान, आगीच्या घटनेनंतर धडगाव येथील काही सेवाभावी संस्था, राजकीय पदाधिकारी यांनी संतोष याच्या घरी भेट देत माहिती                जाणून घेतली़ नुकसानीनंतर झालेल्या पंचनाम्यात काही लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आहे़ संतोष याची सध्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे़ या तयारीत आगीमुळे बाधा निर्माण झाली असून, शासनाने त्याला मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘संतोष’राज्याच्या आणि देशाच्या विविध भागात होणाºया खुल्या मॅराथॉन स्पर्धांमध्ये संतोषने आजवर सहभाग नोंदवला आहे़ यात गेल्यावर्षी ‘लोकमत’ची हाफ मॅराथॉन, नाशिक येथे झालेली नुकतीच झालेली मॅराथॉन स्पर्धा, जानेवारी २०१७ मध्ये झालेली पुणे येथील आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा, वडोदरा येथे झालेली आंतराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा, नाशिक येथे झालेली नाशिक पोलीस मॅराथॉन स्पर्धा, अहमदनगर येथील मॅराथॉन स्पर्धा यात सहभाग नोंदवत लक्ष वेधून घेतले होते़ त्याच्या पुढील स्पर्धांसाठी तो तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील एका शेतावर तयारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे़