शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:07 IST

भरपावसातही आग आटोक्यात येईना : बंब आला पण निम्मा रिकामा

ठळक मुद्देपाणी वाटपामुळे अग्निशमन बंब आले उशिरा मोबाइल विक्रीची दोन दुकाने खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शॉर्ट सक्रिटमुळे लागलेल्या आगीत बसस्थानक परिसरातील मोबाइल विक्रीची दोन दुकाने खाक झाली, इतर दोन दुकानांचे किरकोळ नुकसान झाले. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. दरम्यान, पावसाच्या रिपरिपमध्येही ही आग लवकर आटोक्यात येऊ शकली नव्हती.बसस्थानक परिसरात खासगी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यात ओळीने चार ते पाच मोबाइल विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यापैकी परफेक्ट मोबाइल या दुकानाचे मालक रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. रात्री सव्वाअकरा ते  साडेअकरा वाजेच्या सुमारास दुकानातून धूर येताना काहींना दिसला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दुकान मालकाला सिंधी कॉलनीतून बोलविले असता, त्यांनी दुकानाचे शटर उघडले. त्यानंतर आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्या, त्यानंतर आग आणखी भडकली. शेजारच्या दुकानातदेखील आगीची आस लागल्यानंतर त्या दुकानाचेही नुकसान झाले. इतर दोन दुकानांनाही त्याची झळ पोहोचली. अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. पहिला बंब आला, परंतु त्यात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे लागलीच तो रिता झाला. दुसरा बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत मोबाइलची बॅटरी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्यदेखील जळत असल्याने फटाके फुटण्यासारखे आवाज येत होते. त्यामुळे आगीची भयानकता आणखी जाणवत होती. पावसाच्या रिपरिपमध्येदेखील आग भडकत असल्याचे चित्रही या वेळी पहावयास मिळत होते.नुकसानीचा आकडा मोबाइल  कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर कळू शकणार आहे. याबाबत अग्निउपद्रवान्वये घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

शहरात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे टँकर व अग्निशमन बंबाद्वारे अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यातच ही आगीची घटना घडल्याने बंब येण्यास उशीर झाला. एक बंब आला, परंतु त्यातही अर्ध्यापेक्षा कमी पाणी असल्यामुळे त्याचाही उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात रोषही व्यक्त करण्यात आला.