शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात भुयार आढळल्याने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जलवाहिनीचे लिकेज शोधताना शहादा शहरातील पुरातन गणपती मंदिराजवळ भले मोठे भुयार सापडल्याने परिसरात घबराट ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जलवाहिनीचे लिकेज शोधताना शहादा शहरातील पुरातन गणपती मंदिराजवळ भले मोठे भुयार सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शहादा शहरातील नदी परिसरात यापूर्वी अनेकदा भुयारे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. असेच एक भुयार गुरुवारी जलवाहिनीचे लिकेज शोधताना पालिका कर्मचा:यांना आढळून आले. गोमाई नदी परिसरात सोनार गल्लीत सुमारे 500 वर्षापूर्वीचे पुरातन गणपती मंदिर असून नुकतेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील बाजूस ब्राrाणगल्ली परिसरात काही घरांना नळाचे पाणी येत नसल्याने पालिकेच्या कर्मचा:यांकडून जलवाहिनीचे लिकेज शोधण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काँक्रिटीकरणाचा रस्ता खोदकाम करत असताना रस्त्याचा मोठा भागच खाली भुयारीत पडला. सुमारे पुरुषभर खोलीचा खड्डा रस्त्याखाली असल्याचे उघडकीस आले. रस्त्याखालील   भुयार मंदिराच्या खालून सुमारे                20 ते 25 फूट लांब असल्याचे  समजते. याच परिसरात जलवाहिनीचेच काम करताना सुमारे दीड-दोन महिन्यापूर्वी देखील भुयार सापडले होते. त्यानंतर पुन्हा याच परिसरात भुयार सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मंदिर परिसरात भुयार सापडल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली.सोनार गल्लीतील गणपती मंदिर शहराचे ग्रामदैवत मानले जाते. शहरातील सुमारे 500 वर्षापूर्वीचे शहरातील हे सर्वात पुरातन                  मंदिर असून ब्रिटिश राजवटीपासून शासन दरबारी या मंदिराची नोंद आहे. नर्मदा परिक्रमेतील हे मंदिर असून नर्मदा परिक्रमा करणारे भाविक या मंदिराला भेट देतात. मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाने नुकतेच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून हे काम अंतिम            टप्प्यात आले आहे. असे असताना गुरुवारच्या भुयार सापडल्याच्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. भुयारामुळे मंदिराच्या भिंतींनाही तडे पडले आहेत. मंदिराजवळ असलेले भुयार किती लांब आहे याचा               अंदाज लावता येत नाही. मात्र यामुळे मंदिर व परिसरातील घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने ताबडतोब भुयार बुजवावे, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. सोनारगल्ली, ब्राrाणगल्ली, भोईगल्ली, भावसार मढी, जुनी पोस्टगल्ली हा सर्व भाग गोमाई नदीला लागून आहे. या परिसरात भुयार सापडल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. त्यावर तात्पुरत्या उपाययोजना करून भुयारे बुजविण्यात आले. असे प्रकार वारंवार उघडकीस येत असल्याने पुरातत्व विभाग व भूगर्भशास्त्र विभागातर्फे या परिसराचा अभ्यास झाला पाहिजे अन्यथा एखाद्यावेळी मोठी दुर्घटना घडू शकते अशी प्रतिक्रिया सौरभ जहागिरदार यांनी दिली.