शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व मुलीचा खूनप्रकरणी पित्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पत्नी व मोठ्या मुलीला गळफास लहान मुलीला गळफास देऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पित्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पत्नी व मोठ्या मुलीला गळफास लहान मुलीला गळफास देऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ आॅक्टोबर २०१६ मध्ये तळोदा येथे हा दुहेरी खून झाला होता़देविप्रसाद ऊर्फ शशिकांत अवधप्रसाद दिक्षीत असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात शहादा न्यायालयात खटला सुरु होता़ मंगळवारी खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पठाडे यांनी साक्षीपुरावे तपासल्यानंतर शशिकांत दिक्षित यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़देविप्रसाद ऊर्फ शशिकांत याचा विवाह २००८ मध्ये उत्तरप्रदेशातील अनामिका ऊर्फ निशू यांच्यासोबत झाला होता़ लग्नानंतर निवेशी आणि संचेती या दोन्ही कन्यांचा जन्म झाला होता़ त्यांच्या जन्मानंतरही शशिकांत हा पत्नीचा छळ करत होता़ सासरच्यांनी हुंडा दिला नाही तसेच अनामिका यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता़यातून आॅक्टोबर २०१६ मध्ये अनामिका व नात निवेशी या दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची नोंद तळोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ दरम्यान धाकटी मुलगी संचेती हिने वडीलांनी आई व बहिणीस गळफास दिल्याची माहिती दिल्यानंतर देवीप्रसाद ऊर्फ शशिकांत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता़ याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे यांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते़ न्यायालयात सुनावणीदरम्यान सहा वर्षीय मुलगी संचेती हीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली होती़ सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज अ‍ॅड़ स्वर्णसिंग गिरासे यांनी पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक साठे व सहायक पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी काम पाहिले़आरोपीला जन्मठेपेसह पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे़ खटला सुरु असताना शशिकांत हा जिल्हा रुग्णालयातून फरारही झाला होता़ त्याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले होते़