शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पिता पराभूत, पुत्र मात्र विजयी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:34 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बदलत्या राजकीय प्रवाहात शहाद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी भाजप ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बदलत्या राजकीय प्रवाहात शहाद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली असली तरी त्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे त्यांच्या जागेवर शहादा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी करणारे त्यांचे पुत्र राजेश पाडवी मात्र विजयी झाले आहेत.जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. त्यात विशेषत: भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना शहादा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारुन त्यांच्याजागी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यातून पक्षावर राग व्यक्त करीत उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपला शहादा मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी केली.  परिणामी नंदुरबारची लढत लक्षवेधी ठरली. येथे एकाच पक्षात काम करणारे दोन्ही आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांच्यात लढत रंगली. त्यात उदेसिंग पाडवी यांना मात्र मोठय़ा मताधिक्याने पराभव पत्करावा लागला.दुसरीकडे शहाद्यात उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी हे मात्र भाजपकडून विजयी झाले. उमेदवारी मिळाल्यापासून पिता-पुत्रात अंतर्गत कलहाच्या चर्चा रंगत राहिल्या होत्या. मात्र अखेर राजेश पाडवी यांचा विजय झाला. त्यामुळे पिता पराभूत आणि पुत्र विजयी झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.नवापुराचा वारसाही पुत्राकडेनवापूर येथे काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक हे विद्यमान आमदार होते. या वेळी मात्र त्यांचे वय झाल्याने काँग्रेसने त्यांचे पुत्र शिरीष नाईक यांना उमेदवारी दिली होती. सुरुपसिंग नाईक यांनीदेखील पुत्र शिरीष यांना विजयी करण्यासाठी पूर्ण प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यात त्यांना यश आले असून आता सुरुपसिंग नाईक यांचा वारसा पुत्र शिरीष नाईक यांच्याकडे गेला आहे.