शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांकडून सांभाळ होत नसलेल्या वृद्धांचे प्रशासन विरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : म्हातरपणी पोटची मुलं वागवत नाहीत, ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियमाचीही दखल घेतली जात नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : म्हातरपणी पोटची मुलं वागवत नाहीत, ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियमाचीही दखल घेतली जात नाही, जिल्हा दंडाधिका:यांच्या निर्णयाबाबतही प्रशासन दखल घेत नाही. यामुळे आधारहिन झालेल्या चौघा वृद्धांनी 1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबारसह जिल्ह्यातील सोनपाडा, ता.नंदुरबार व कोळदा, ता.नंदुरबार येथील चार वृद्धांवर ही आपबिती झाली आहे. या चौघा वृद्धांनी आपली मुलं वृद्धपणी सांभाळ करीत नसल्यामुळे उपासमार होत असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. शासनाने यासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 आणि त्या अंर्तगत नियम 2010 तयार केला आहे. याअंतर्गत तक्रार करता येते. परंतु संबधीत प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तो अर्ज खारीज केला होता. त्या विरोधात जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले. अपीलावर सुनावणी होऊन 29 जानेवारी, 30 नोव्हेंबर व 6 डिसेंबर 2018 रोजी अजर्दारांच्या बाजुने आदेश पारित करण्यात आले होते. या आदेशाचा मुलांकडून अनादर होत असल्याने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संबधीत वृद्धांनी ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्या माध्यमातून कारवाईची मागणी केली. परंतु त्यांच्याकडूनही योग्य ते पाऊल उचलले गेले नाही किंवा कारवाई केली गेली नाही. यामुळे वृद्धांना अनेक समस्यांना आणि उपासमारीलाही सामोरे जावे लागत आहे. मुलं वागवत नाहीत व थाराही देत नाहीत, प्रशासन देखील कायद्याच्या आधारे कारवाई करीत नाही, यामुळे हवालदिल झालेल्या चौघा वृद्धांनी आता बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेने या वृद्धांना न्याय देण्यासाठी लढा देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रत्येक उपविभागासाठी एक न्यायधिकरण या अधिनियमाद्वारे स्थापन करण्यात आले आहे. न्यायधिकरणातील निर्णयावर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अपील करता येते. न्यायाधिकरण हे दिवाणी न्यायालय मानण्यात येवून त्यांना त्यासंदर्भातील सर्व अधिकार आहेत. निर्वाह आदेश पारीत झालाच तर वृद्धाचा अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याची काळजी या मुलभूत गरजा लक्षात घेतल्या जातील. वृद्धाला सर्व मार्गानी मिळणारे एकत्रित उत्पन्न भागिले त्या कुटूंबातील अजर्दारासह एकुण व्यक्ती किंवा कमाल दहा हजार रुपये दरमहा असा निर्वाह आदेश पारीत करण्याची तरतूद आहे.