शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या भीतीमुळे शेतीकामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक दहशतीने भयभीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक दहशतीने भयभीत झाले आहेत. शेतक:यांना शेतामधील पिकांची आंतरमशागत निंदणी, कोळपणीसाठी शेतमजूर  बिबटय़ाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. वनविभागाने तातडीने बिबटय़ांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ांचा मोठय़ा प्रमाणावर संचार असल्यामुळे दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले तर तीन जणांना गंभीर जखमी केले आहे. बिबटय़ांनी परिसरातील अनेक शेळ्या फस्त केल्या असून त्याचा थांगपत्ताच नाही. त्यासाठी पानसेमल व खेतिया परिसरात ठिकठिकाणी पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे. या सततच्या घटनांमुळे जनतेत वनविभागबद्दल तीव्र नाराजी असून वनविभागाच्या कार्यालयावर जुनापानी, ता.पानसेमल व परिसरातील नागरिकांनी दोन दिवसापूर्वी घेराव घालून संताप            व्यक्त केला होता. यावेळी आदिवासी युवा एकता परिषद पानसेमल व विविध संघटना, पानसेमल ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप शितोळे, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने वनविभाग व अनुविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे वनविभागावर तीव्र संताप व्यक्त केला.पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ांच्या मोठय़ा प्रमाणावर संचारमुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक भयभीत असल्यामुळे वनविभाग व शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात यासाठी अनुविभागीय अधिकारी सुमेरसिंह मुजालदा यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे पानसेमल मंडळ अध्यक्ष व्ही.पी. सिंह सोळंकी, माजी आमदार दिवानसिंह पटेल, लोकेश  शुक्ला, देवराज पाटील, भाजपा युवा मोर्चा बडवानी जिल्हाध्यक्ष राम सोनाने, भाजपा खेतिया मंडळ अध्यक्ष हेमराज पाटील, श्याम बर्डे व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.