लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : दुधखेडा ता.शहादा येथील धरणात यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील लहान-मोठे तलावही पूर्ण भरले आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत आशा उंचावल्या आहेत.यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने दुधखेडासह परिसरातील सर्वच तलाव व धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे परिसरातील शेत शिवारासह मंदाणे, असलोद, न्यू असलोद येथील कोरडवाहू शेतक:यांच्या जमिनीस संजीवनी मिळाली आहे. दुधखेडा धरणाच्या पाण्यातून खरीप व रब्बी हंगाम मिळून एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येणार असल्याने रब्बी हंगाम यंदा चांगला येईल, अशी आशा शेतक:यांकडून व्यक्त केली जात आहे.दुधखेडा धरणातील पाण्याचा पुरेपूर उपयोग शेती सिंचनासाठी होण्यासाठी साठलेल्या पाण्याच्या वापरासंदर्भात नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही शेतक:यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतक:यांना लाभ मिळवून देण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात उशिरा का होईना परंतु पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांसह विहिरी व कुपनलिकांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. तसेच लोंढरे लघुप्रकल्पासह शहाणा, लंगडी, लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या पाण्यामुळे परिसरातील शेतशिवार बागायत होणार आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठय़ाचे पाणी वापरासंदर्भात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
शहादा तालुक्यातील दुधखेडा येथील धरणात यंदा पाण्याचा साठा पूर्ण क्षमतेने झाला असून शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. धरणातील पाणीसाठय़ामुळे या परिसरातील विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळीही वाढली आहे. या धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देण्यासाठी पाटचा:या तयार केल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत या पाटचा:यांची दूरवस्था झाली आहे. खरीप हंगाम संपल्यानंतर धरणातील पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतील. त्यामुळे या धरणातील लाभक्षेत्रातील रब्बीतील पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी या धरणाच्या पाटचा:यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.