शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘देशाटन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून शेतकरी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यात भेटी देत असल्याचे दिसून आले आहे.‘लोकमत’ने याबाबत पडताळणी केली असता, जिल्ह्यातील अनेक भागात यंदा कांदा लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वितरक आणि कांदा बियाणे विक्रेते यांच्याकडे बियाणे शिल्लक नसल्याचा दावा त्यांच्याकडून होत आहे. परंतु काही ठिकाणी दीड हजार रूपये किलो दराने मिळणारे बियाणे शेतकरी चक्क तीन हजार रूपये किलो दर देवून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे रांगडा कांद्याची नोव्हेंबर महिन्यापासून लागवड सुरू करण्यात येते. यंदाही शेतकरी कांदा लागवडीच्या प्रयत्नात होते. परंतु गेल्या काही महिन्यात कांदा बियाणे निर्मिती प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. यातून बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यातून जिल्ह्यात कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नातेवाईक तसेच ओळखीच्यांना संपर्क करुन बियाणे मागणी करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात कांदा दरांमध्ये होणाºया घसरण आणि वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कांदा लागवडीत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा पाउसही चांगला झाला असल्याने शेतकºयांकडून कांदा लागवडीवर भर देण्यात येत आहे.४नंदुरबार तालुक्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड होण्याची शक्यता होती. शेतकºयांनी मराठवाड्यातील कन्नड आणि औरंगाबाद परिसरातून बियाण्याची आवक केली आहे. हे बियाणे अत्यंत महाग दरांनी मागणवण्यात आले आहे.४जिल्ह्यात गेल्या हंगामात कांदा उत्पादन हे एकरी साठ ते सत्तर किलो पर्यंत आले होते. परिणामी बियाणे तयार होण्याची प्रक्रिया झालेली नाही. म्हणून शेतकरी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही सातत्याने चाचपणी करुन बियाण्याची मागणी करत आहेत.४जिल्ह्यात पावसाळी कांदाही खराब झाला असल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.यंदा कांदा बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. शेतकरी सर्वत्र संपर्क करुन कानोसा घेत आहेत. परंतु यश पदरात पडत नाही. बियाणे टाकण्याची वेळ टळत असल्याने अनेक जण वाढीव आणि चढ्या दराने कांद्याची खरेदी करत आहेत. ही स्थिती नंदुरबार तालुक्यात सर्वत्र आहे.-समाधान पाटील,शेतकरी, आसाणे ता. नंदुरबार.कृषी विभाग शेतकºयांच्या बियाणे टंचाईवर लक्ष ठेवून आहे. ३४ क्विंटल बियाणे व्यापाºयांकडे होते. हे सर्व बियाणे विक्री झाले आहे.-एन.डी.पाडवी, बियाणे गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग, नंदुरबार.