शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्यातूनच रोज २०० जणांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

नंदुरबार : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात २०० कैदी असून, या ठिकाणी विविध उपक्रम राबवून कैद्यांमधील सकारात्मक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला ...

नंदुरबार : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात २०० कैदी असून, या ठिकाणी विविध उपक्रम राबवून कैद्यांमधील सकारात्मक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून परसबाग फुलविण्यात आली असून, त्यातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे.

नंदुरबारात जिल्हा मध्यवर्ती कारागृह साक्री रस्त्यावर आहे. या ठिकाणी अंडर ट्रायलचे २०० कैदी आहेत. या कैद्याचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहे. कैद्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून परसबागेत काम करवून घेतले जात असते. हौस असलेले कैदी या ठिकाणी श्रमदान करतात. त्यातील काही शेतीविषयी जाणकार असल्याने त्यांच्या माध्यमातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यांचा उपयोग स्थानिक ठिकाणीच केला जात असल्याचे चित्र आहे.

n कारागृहाचा परिसर मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी शेती करण्यास वाव आहे. ही बाब लक्षात घेता परसबागेत पालक, मुळा, मेथी, आंबटचुका, डेमसे, भेंडी, वांगी, आदी लागवड करण्यात आली आहे.

n कामाची आवड असलेले कैदी दररोज श्रमदान करून या भाजीपाला पिकाची निगा राखतात. त्यांनाच हा सकस आहार कामी येत असतो.

n दररोज सकाळी योगा केला जातो. आवड असलेले बहुतेक सर्वच जण यात सहभागी होतात. याशिवाय सामूहिक प्रार्थना देखील केली जाते.

n स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जाते. त्यासाठी कारागृह कर्मचाऱ्यांसह स्वत: कैदीदेखील प्रयत्नशील राहत आहेत.

जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत. त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते. त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो. ज्यांना शेतीकामाची आवड आहे, ते स्वत: श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवत आहे. तोच भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे. सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे.

-राजेंद्र देशमुख,

जिल्हा कारागृह अधिकारी, नंदुरबार.