शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन ...

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा स्वतःवर कितीही संकट आले तरी आपली कामे सुरळीतपणे चालू ठेवत आपल्या अन्नधान्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून लोकांनी पपई व केळीचे पीक घेतले होते. मात्र, त्यावेळेस खर्चही निघाला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस, डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस, तसेच मार्च महिन्यात गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण लावलेल्या मालाला भाव मिळेल की नाही? लॉकडाऊन काळात उत्पन्न निघाले तर तो माल विकला जाईल की नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा शेतकरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह सगळीकडे जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही विहिरी, तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. सध्या लॉकडाऊन काळातही जयनगरसह परिसरातील कोंढावळ, वडाळी, धांद्रे, निंभोरे, बोराळे या गावांमधील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये पपई, केळी, ऊस यासारखी पिके लावण्यावर भर देत आहेत.

लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले तरी शेती हा असा व्यवसाय आहे की, तो कधीही बंद पडत नाही. मागीलवर्षी आमच्या केळी, पपई पिकाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी आम्ही सध्या लॉकडाऊन काळातही या पिकांची लागवड करीत आहोत.

- वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.