शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरबाबत जनतेच्या मनातील गैरसमज दूर करा : ॲड. के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टरांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टरांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये आणि जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, रुग्णालयांनी रेमडेसिविर औषधासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी. रुग्णाचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांच्या मनातील भीती घालविताना त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करावे. शासनाने निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालयाबाहेर लावावा.

कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याने एमडी मेडिसिन डॉक्टरांनी आठवड्यातील एक दिवस आपली सेवा जिल्हा प्रशासनास द्यावी. जिल्ह्यातील डॉक्टरांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आदिवासी भागात डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेने स्वयंस्फूर्तीने आपली सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी द्यावी. डॉक्टरांचे काम हे देवाप्रमाणे आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे कार्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. भारुड म्हणाले, डॉक्टरांनी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी सहकार्य करावे. रेमडेसिविर औषधाचा उपयोग मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. आवश्यक नसताना सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेडचा उपयोग करू नये. संकटाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. काही दिवसांतच आरटीपीसीआरची दुसरी प्रयोगशाळा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.