शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

वीज, पाणी, रस्त्यांची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : काथर्दे, ता.शहादा येथील २७ प्रकल्प बाधित कुटुंबांचे गेल्या तीन वर्षांपासून संबंधीत नर्मदा विकास विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : काथर्दे, ता.शहादा येथील २७ प्रकल्प बाधित कुटुंबांचे गेल्या तीन वर्षांपासून संबंधीत नर्मदा विकास विभागाने येथे पुनर्वसन करूनही आजतागायत त्यांना वीज, पाणी, रस्ते अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अशाच स्थितीत ही कुटुंबे त्या ठिकाणी राहत आहे. सुविधांबाबत संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांनी कानावर हात ठेवल्याचा आरोप विस्थापितांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने तरी दाद द्यावी, अशी मागणी बाधितांनी केली आहे.शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर या नवीन पुनर्वसन वसाहतीत धडगाव तालुक्यातील १०७ विस्थापीत कुटुंबांचे शासनाने पुनर्वसन केले आहे. त्यातील २७ कुटुंबांना २०१७ मध्ये तेथे आणले आहे. नर्मदा विकास विभागाने त्यांना तात्पुरते शेड उभारून दिले आहेत. परंतु तीन वर्षे झालीत अजूनही नर्मदा विकास विभागाने जमीन सपाटीकरण करून दिलेली नाही. एवढेच नव्हे तर या कुटुंबांना साध्या पिण्याचे पाणी, गटारी व रस्ते या प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकंती करावी लागत असते असे प्रकल्पग्रस्त म्हणतात.वास्तविक कुटुंबांचे पुनर्वसन करण्याआधी तेथे संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय पुनर्वसन करू नये, असे नर्मदा अवार्डमध्ये स्पष्ट असतांना संबंधीत प्रासन शासनाचा नियम धाब्यावर बसवत मनमानीपणे आणून सोडत असते, असा आरोप ही विस्थापितांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासनाशीदेखील असेच ठरले असतांना त्यांनीही याकडे साफदुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधितांचा वचक नर्मदा विकास विभागावर नसल्यामुळे या अधिकाऱ्यांचे फावत असल्याचे विस्थापित सांगतात.दरवर्षी पावसाळा जवळ आला की, विस्थापितांच्या प्रश्नांवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्याचाी दिखाऊपणा केला जातो. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. पावसाळ्या पूर्वी आम्हाला आमच्या वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाा विस्थापितांनी दिला आहे.दरम्यान या ठिकाणी पुन्हा ५० विस्थापितांना आणण्याचे संबंधित नर्मदा विकास विभागाचे नियोजन आहे. मात्र यांनाच नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यांचा प्रश्न कसा सोडविणार, असा सवालही बाधितांनी उपस्थित केला आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी विस्थपीतांच्या गावठाणात शिरले होते. या पाड्यात त्यांचा संपूर्ण संसार उघड्यार आला होता. नाल्याच्या पुढे झालेल्या अतिक्रमणामुळे नदीतील पाणी वसाहतीत शिरले होते. याबाबत संबंधीत यंत्रणेने अजूनही कुठल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत, असे विस्थापितांचे म्हणणे आहे. वास्तविक शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढून नाल्याचे खोलीकरण करण्याचले ठरले होते. परंतु उदासीन यंत्रणेने पावसाळा जवल आलेला असतांना अजून पावेतो कुठलीच कार्यवाही केली नसल्याचे विस्थापीत सांगतात. जसे बाधितांची मुळगावातून घरे शिफ्ट करण्याची कार्यवाही तत्परतेने केली जाते, तशी त्यांचा जमीन खरेदी, सीमांकण, संपादन, सिंचन सुविधा, नागरी सुविधा, नाला खोलीकरणच्या कामाबाबत अशी तत्परता का दाखविली जात नाही, असा उदिग्न सवाल बाधितांनी उपस्थित केला आहे. अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा अंत न पाहता विकासाबाबत ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.माझ्या मुळ गावातून मला काथर्दे दिगर वसाहतीत गेल्या तीन वर्षांपूर्वी शिफ्ट केले आहे. तथापि येथे अजून पावेतो रस्ते, पाणी, लाईट, गटारी या सारख्या प्राथमिक सुविधादेखील संबंधीतांनी उपलब्ध करून दिलेलञया नाहीत. ठोस प्रयत्नांऐवजी पोकळ आश्वासन दिले जाते. आता पश्चाताप होत आहे.-लालसिंग वसावे, प्रकल्प बाधित, काथर्दे पुनर्वसन.