शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आठ पोल्ट्रीचे अहवाल पॅाझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : येथील दहा कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : येथील दहा कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या आठ पोल्ट्री फार्म चे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. तर सात अहवाल निगेटिव्ह आले आहे. सात पोल्ट्री चे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्या पोल्ट्रीतील पक्षी नष्ट होणारच असल्याने त्या व्यासायीकांची चिंता वाढली आहे.पहिल्यांदा शनिवारी चार अहवाल पॉझीटीव्ह आले त्यानंतर सोमवारी पाच पैकी चार अहवाल पॉझीटीव्ह आले तर मंगळवारी १५ पैकी तब्बल आठ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटीव्ह आल्याने व्यावसायिकांनी चांगली धास्ती घेतली आहे. आतापर्यंत तालुक्यातील २७ पोल्ट्रीतील एकूण १६ पोल्ट्रीत बर्ड फ्ल्यू लागण झाली आहे.असून पैकी १० पोल्ट्री फार्मचे पक्ष्यांचे कलिंगचे काम आज सायंकाळी पूर्ण झाले आहेत. गुरूवारी सहा पोल्ट्रीतील कुकुट पक्षांना नष्ट करण्यात येणार आहे.मंगळवार रात्री ११ वाजेच्या उशिरा आलेल्या अहवालात लहान चिंचपाडा व पिंपळनेर रस्त्यावरील मुस्तफा पोल्ट्री १ व २, श्रेयश पोल्ट्री,सफा पोल्ट्री,न्यु शांती पोल्ट्री,एफ-सन्स पोल्ट्री,जस पोल्ट्री व शाहीन पोल्ट्री या आठ पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.पहिल्यां दिवशी ४० हजार कुकुट पक्षी नष्ट केले. दुसर्‍यादिवशी एक लाख ५ हजार ३०३, तिसऱ्या दिवशी ८४ हजार ७८७ तर आज चौथ्या दिवशी चार पोल्ट्री फार्म मधील १ लाख १२ हजार २९२ कोंबड्यांचे कलिंग करण्यात एकूण आतापर्यंत तीन हजार २८ हजार २५१ कुकुट पक्षी नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.बुधवारी अंडी मोजणी करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक, पशुसंवर्धन कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. बिलमांजरे रस्त्यावरील पालावाला पोल्ट्री फार्मच्या ५९ हजार सहाशे, मुस्तफा-एक मध्ये २३ हजार २५१,-श्रेयस पोल्ट्रीच्या ४ हजार २०० तर न्यु डायमंड मध्ये २५ हजार २४१ असे एकूण आज १ लाख १२ हजार २९२ पक्ष्यांचे कलिंग झाले. आज पर्यंत ३ लाख २८ हजार २५१ पक्ष्यांचे कलिंगचे काम झाले आहे.गेल्या चार दिवसांपासुन पुणे येथील पशुसवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, प्रांत अधिकारी वसुमना पंत,तहसिलदार मंदार कुलकर्णी,पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस.राऊतमाने,उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील,उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक नासिर पठाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशीकांत वसावे आदी सर्व अधिकारी परीस्थीवर नजर ठेऊन आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या परिस्थितीची पाहणीकरीत माहिती जाणून घेत आहेत.पोल्ट्री परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

२७ पोल्ट्रीमधील पशुखाद्य केले सील... तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत २७ पोल्ट्री मधील पशुखाद्याची मोजमाप व पंचनामा करून पशुखाद्य गोडाऊनमध्ये सील करण्याची कामगिरी करण्यात आली आहे. नवापूर शहरातील मोठ्या पोल्ट्री मध्ये पशुखाद्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पशुखाद्य पोल्ट्री फार्म मध्ये दिसून येत आहे. यात मका, सोयाबीन ढेप, शिंग ढेप, ज्वारी या पासून पोल्ट्री व्यवसायिकांनी आधुनिक मशिनरी च्या सहाय्याने पशुखाद्य तयार केले जाते. व्यवसायिकांनी पशुखाद्य नष्ट न करता त्याला ९० दिवसांपर्यंत सील करून ठेवावे त्यामुळे शासनाचे व व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार नाही अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बुधवारी प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मचे कोंबडी खाद्याचे गोडावून सील केले.आमदार शिरिषकुमार नाईक यांनी बर्ड फ्ल्यू भागातील पालावाला पोल्ट्रीत पाहणी केली किती कुकुट पक्षी आहेत, अंडी किती आहेत, पशुखाद्य किती अशी चौकशी करून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची समस्या जाणून घेतली.  विधानसभेत नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल पशुसंवर्धन मंत्र्याशी चर्चा करून तात्काळ मदत निधीत मिळावी यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती आमदार शिरिषकुमार नाईक यांनी दिली.