शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीची दशा संपावी म्हणून ‘अंडी व ताक’ मात्रेची ‘दिशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात यंदा मिरचीवर पुन्हा घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगावर नियंत्रण ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यात यंदा मिरचीवर पुन्हा घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक प्रयोग थांबवत घरगुती ईलाजांना प्राधान्य दिले आहे. यातून तालुक्यात बºयाच ठिकाणी मिरचीवर गोमूत्र, अंडी आणि ताकाच्या मिश्रणाची फवारणी सुरू झाली असून यामुळे दशा झालेल्या मिरची पिकाला दिशा मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.नंदुरबार तालुक्यात यंदाही सुमारे १ हजार ६०० हेक्टर मिरची लागवड झाली आहे. यंदा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसाचा फटका मिरची पिकाला बसला असून यातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मिरची पाण्यात सापडून नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांची मिरची झाडे उभी आहेत. त्यांना मिरचीवर चुरडा-मुरडा अर्थात घुबडाचा आजार दिसून येत आहे. यातून पाने चुरगळली जावून फळधारणा होणाºया झाडाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावून झाडे फळधारणेविनाच रहात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी मिरची झाडांवर रासायनिक औषधांची फवारणी केली होती. परंतु त्यात यश मिळालेले नव्हते. यातून शेतकºयांनी यापूर्वी अमंलात आणलेला देशी दारू फवारणीचा इलाज करण्यास सुरूवात केली होती. यापासून पुढे जात तालुक्यातील तज्ञ शेतकºयांनी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवत उकडलेल्या अंड्याचा चुरा आणि ताकाचे मिश्रण करुन मिरची झाडांवर फवारणीला सुरूवात केली आहे. तिघा घरगुती उपायांच्या माºयामुळे मिरचीची झाडे पूर्ववत होत असल्याचा शेतकºयांचा दावा असून या उपायामुळे मिरची हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  • नंदुरबार तालुक्यातील लहान शहाद्यासह शिंदे, कोळदे, पळाशी या परिसरातील तसेच लगतच्या गुजरात राज्यातील पिंपळोद, वेलदा, निझर, यावल, वाका चाररस्ता या गावांमधील शेतकरी या उपायांची अंमलबजावणी करत आहेत. साधारण २५ पंपांसाठी ३५ अंडी उकडून ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवत घरी तयार केलेल्या ताकात एकत्र करुन ते मिश्रण पिकांवर फवारले जात आहे. दरम्यान गुजरात राज्यातील काही शेतकरी देशी दारूचाही मुबलक प्रमाणात वापर करत आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसात शेतकरी चुरडा-मुरडाच्या आक्रमणाने शेतातील मिरची झाडे उपटून फेकत असल्याचेही दिसून आले आहे.
  • दरम्यान पाचोराबारी ता. नंदुरबार येथील शेतकºयाने पाच तर गुजरातमधील मुबारकपूर येथील एका शेतकºयाने चुरडा-मुरडामुळे खराब झालेल्या सहा एकर मिरची पिकावर नांगर फिरवला होता. 
  •  
  • चुरडामुरडामुळे पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले होते. यातून शेतकरी हैराण झाले होते. रासायनिक औषधींची मात्रा कामी येत नसल्याने शेतकºयांनी पारंपरिक उपाययांकडे लक्ष दिले आहे. अंडी, ताक यांचा वापर यापूर्वीही शेतकरी करत आले आहेत. शेतीक्षेत्रात प्रामुख्याने स्लरी हा प्रकार रूढ आणि प्रभावी आहे. अनेक शेतकरी त्याचा वापर करतात.
  • -वसंत हिरामण पाटील, शेतकरी, बामडोद ता. नंदुरबार.